शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
8
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
9
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
10
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
11
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
12
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
13
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
14
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
15
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
16
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
17
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
18
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
20
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
Daily Top 2Weekly Top 5

‘मेट्रो मीरा-भार्इंदरला जोडा’

By admin | Updated: October 26, 2015 00:45 IST

अंधेरी ते दहिसर पूर्व दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच पडले असून तत्पूर्वी मुलुंड ते कासारवडवलीदरम्यानचा मेट्रो प्रकल्प घोषित केला आहे.

भार्इंदर : अंधेरी ते दहिसर पूर्व दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच पडले असून तत्पूर्वी मुलुंड ते कासारवडवलीदरम्यानचा मेट्रो प्रकल्प घोषित केला आहे. दोन्ही मार्ग मीरा-भार्इंदर शहरांच्या वेशीवर असल्याने येथील स्थानिक प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होण्यासाठी ते घोडबंदरमार्गे शहराला जोडण्याची मागणी खा. राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.मीरा-भार्इंदरकरांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे, एसटी, बेस्ट, टीएमटी व एमबीएमटी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तर खाजगी वाहनांसह रिक्षा उपलब्ध आहेत. यातील स्थानिक परिवहन सेवा (एमबीएमटी) ही शहरांतर्गत प्रवासासाठी सोयीस्कर असली तरी ती समाधानकारक नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या सेवेचे नियोजित २७ मार्ग असले तरी आजमितीस केवळ ७ ते ८ मार्गांवरच सेवा सुरू आहे. अलीकडेच येथील संतप्त प्रवाशांसह ग्रामस्थांनी बंद पाळून स्थानिक परिवहन सेवेविरोधात रोष व्यक्त केला होता. या सेवेव्यतिरिक्त उपलब्ध वाहतूक व्यवस्थासुद्धा येथील प्रवाशांसाठी तोकडी पडत असल्याने उपलब्ध वाहतुकीवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे शहरात जलवाहतुकीचा पर्याय दरम्यानच्या काळात शोधण्यात आला आहे. तत्पूर्वी मेट्रो रेल्वेचा टप्पा क्र. ७ मध्ये शहराचा समावेश असतानाही त्याला बगल देऊन राज्य शासनाने हा प्रकल्प मीरा-भार्इंदरच्या वेशीवर आणून त्याला त्यातून वगळले. तर, वेशीवर काही अंतरावरील कासारवडवली येथून मेट्रोच्या प्रकल्पाची घोषणा केली आहे.