शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

अमूल पंडीत यांच्या ‘माझ्याही कविता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ठाण्यात संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 18:20 IST

अमूल पंडीत यांच्या ‘माझ्याही कविता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दुसरा मजला, सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे (प.) येथे पार पडले. 

ठळक मुद्देअमूल पंडीत यांच्या ‘माझ्याही कविता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न ... तर विद्यार्थी हा कवितेपासून लांब राहतो - अरुण म्हात्रे

ठाणे: अमूल पंडीत यांच्या ‘माझ्याही कविता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दुसरा मजला, सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे (प.) येथे सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी शिक्षक चांगला नसेल तर विद्यार्थी हा कवितेपासून लांब राहतो असे आपल्या मनोगतात सांगितले.     कार्यक्रमाची सुरूवात अमूल पंडीत यांनी लिहीलेल्या कविता आणि गाण्यांनी झाली. पाऊस - पाऊस, व्हॉट्सअ‍ॅप, विसरुन जाणे, अजून सारे तसेच आहे, लग्न, अजूनही यांसारख्या कविता तर कळत नाही मला, कधी स्मरावे तू मजला अशी अनेक गाणी यावेळी सादर झाली. यावेळी अरुण म्हात्रे हे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच, अभिनेते किरण करमरकर, नाट्यदिग्दर्शक विश्वास सोहोनी, ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर भाटलेकर, लेखक माधव चिरमुले आणि लेखक, कवी अमूल पंडीत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ््याचे प्रास्ताविक संगीता पंडीत यांनी केले. त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत अमूल पंडीत यांच्यासोबतच्या आठवणी, किस्से सांगितले. एका कविने दुसऱ्या कवीला छान म्हणणं कठिण असते असे म्हात्रे हे मिश्किलपणे सोहळ््याप्रसंगी म्हणाले. मला चित्रकला, कविता याबद्दल नेहमी कुतूहल वाटते. अनेक कलांचे क्लासेस असतात. परंतू येथे कविता शिकवून देता येते असा क्लास आजवर कुठे नाही. कविता ही सुचावीच लागते, ती यावीच लागते. सुचणं असते तिथे देव असतो अशा भावना व्यक्त करीत सोशल मीडियामुळे पुस्तक बघणं अवघड झाले आहे. परंतू मला पुस्तकाची प्रचंड आवड आहे, मी पुस्तकं वाचतो असे किरण करमरकर यांनी सांगितले. यानंतर विश्वास सोहोनी, प्रभाकर भाटलेकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. माधव चिरमुले यांनी अमूल पंडीत यांच्या गीतांचा अल्बम निघावा अशी इच्छा व्यक्त केली. अश्लेषा पंडीत हिने कार्यक्रमाचे निवेदन केले. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक