शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील सीएनजी पंपाला नवीन वर्षातही मुहूर्त मिळेना !

By admin | Updated: February 5, 2016 02:48 IST

सीएनजी रिक्षा चालवण्याची सक्ती आरटीओने केलेली असली तरीही त्यासाठी लागणारा गॅसपुरवठा करणारा पंप डोंबिवलीत नाही. त्यामुळे एकूण पाच हजार परमिट रिक्षांपैकी

अनिकेत घमंडी,  डोंबिवलीसीएनजी रिक्षा चालवण्याची सक्ती आरटीओने केलेली असली तरीही त्यासाठी लागणारा गॅसपुरवठा करणारा पंप डोंबिवलीत नाही. त्यामुळे एकूण पाच हजार परमिट रिक्षांपैकी गॅसवर चालवणाऱ्या चार हजारांहून अधिक रिक्षाचालकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. यासंदर्भात दोनवेळा आंदोलने होऊनही राजकारण्यांनी केवळ तारीख पे तारीख देत वाहनचालकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. डिसेंबरअखेरीस ही सुविधा मिळेल, असे आश्वासन राजकारण्यांनी दिले होते. मात्र, तरीही त्यास मुहूर्त मिळत नसल्याचे स्पष्ट झाले.शहरामध्ये गॅस सुविधा नसल्याने डोंबिवलीकरांना सध्या कल्याण, उल्हासनगरसह महापे येथे जावे लागत आहे. त्यामध्ये त्यांचा वेळ-गॅस व पैसा वाया जात आहे. येथील चित्ते पेट्रोलपंपावर ही सुविधा मिळणार असली तरी ती कधी, असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्यासाठीच्या आवश्यक त्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी महानगर गॅस निगम यांच्याकडून जलद हालचाली करण्यात आल्या होत्या. आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. त्याचे काय झाले, असा संताप बहुतांश रिक्षाचालकांमध्ये आहे. काही महिन्यांपूर्वीच महानगर गॅस निगमच्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसी परिसरातील सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. तेव्हा त्यांनी घरोघरी गॅसपुरवठा करण्यासह या ठिकाणी प्राधान्यक्रमाने पंप सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगितले होते. रहिवासी संकुलात जूनपर्यंत तर सप्टेंबरपर्यंत इतरांना गॅस सुविधा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु, प्रत्यक्षात काम झाले नसल्याचे स्पष्ट आहे. चित्ते पंपावर महिनाभरापूर्वी कामही करण्यात आल्याचे सांगण्यात आले.