शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अभिजात मराठी ५०० कोटींची

By admin | Updated: March 21, 2017 01:58 IST

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित का आहे? तर हा दर्जा मिळाला, तर भाषेसाठी ५०० कोटींची तरतूद

डोंबिवली : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित का आहे? तर हा दर्जा मिळाला, तर भाषेसाठी ५०० कोटींची तरतूद करावी लागेल. अर्थात हा सगळाच निधी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या कामावरच खर्च केला जाणार नाही. पण या निधीची तरतूद करावी लागेल. तेच अर्थकरण यामागे दडले आहे, असा गौप्यस्फोट अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी केला.यंदाच्या अर्थसंकल्पात मराठी भाषेसाठी केवळ १७ कोटींची तरतूद आहे. म्हणजे प्रति व्यक्ती एक रुपयाही सरकार देऊ शकत नाही. म्हणजे सरकार किती करंटे आहे. आपण केवळ अंधारात चाचपडत आहोत. सरकारकडे पैसे नाही. त्यामुळे केवळ ही कोंडी आहे. महाराष्ट्राच्या एकूण अर्थसंकल्पातील तरतुदीपैकी केवळ ४३ टक्केच रक्कम खर्ची होते. मग उर्वरित ५७ टक्के रक्कमेचे काय होते? विविध प्रकरणांत दिला जाणारा निधी खर्चच केला जात नाही. तो परत सरकारकडे पाठवला जातो. ही गंभीर बाब आहे. केंद्राच्या धोरणाप्रमाणे ग्रंथ विकासावर व ग्रंथालयावर प्रत्येक वर्षी प्रतिव्यक्ती केवळ ६० पैसे खर्च होतात. भाषाही दुय्यम प्राधान्याची झाली आहे. लेखक, साहित्यिक, कलावंत यांच्या मागे सरकार उभे राहत नाही. मराठी ही ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची भाषा झाली पाहिजे, असे पाहिल्यांदाच निसंदिग्धपणे मुख्यमंत्री संमेलनाच्या व्यासपीठावर बोलले होते. एवढाच दबाव आपण तयार करू शकलो आहोत, असे ते म्हणाले.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेले नाही. ज्ञानभाषा न झाल्यामुळे मराठीची पीछेहाट होत आहे. राज्य सरकार त्यासाठी कोणतेही ठोस पवित्रा घेताना दिसत नाही. त्यामुळे राज्यभरातील मराठीसाठी काम करणाऱ्या संस्थांनी एकत्र येऊन मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्यव्यापी चळवळ उभारली जावी, यासाठी पहिली बैठक साहित्य संमेलनाच्या कार्यालयात पार पडली. मराठी भाषा संरक्षण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शांताराम दातार यांनी, महामंडळाने मराठी भाषेसाठी राज्यव्यापी चळवळ उभी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली. बैठकीला संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे, स्वागताध्यक्ष गुलाब वझे, मसापच्या पुणे शाखेचे प्रकाश पायगुडे, शांताराम दातार आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)