शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाबाबत शेतकऱ्यांकडून मागविले आक्षेप

By admin | Updated: September 29, 2015 23:42 IST

मुंबई - बडोदा व्हाया पनवेल या द्रुतगती महामार्गासाठी पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. या संदर्भात काही आक्षेप असतील तर

वाडा : मुंबई - बडोदा व्हाया पनवेल या द्रुतगती महामार्गासाठी पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. या संदर्भात काही आक्षेप असतील तर ते लेखी स्वरूपात बाधीत शेतकऱ्यांनी सक्षम अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांकडे लेखी स्वरूपात पुराव्यासह दाखल करण्याची अधिसूचना जारी केल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. शेतकऱ्यांनी या रस्त्याला तीव्र विरोध दर्शविला असून एक इंच जमिनीलाही हात लावू देणार नाही असा गंभीर इशारा शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष कृष्णा भोईर यांनी दिला आहे. या द्रुतगती महामार्गाचे काम केंद्र सरकारने हाती घेतले असून हा रस्ता ३८० किलोमीटर अंतराचा आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, पालघर, वसई आणि वाडा तर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यातून हा रस्ता पनवेलला जोडला जाणार आहे. वाडा तालुक्यातील निबंवली, गोराड, केळठण लोहोपे व चांबळे या गावाच्या हद्दीतून हा रस्ता जाणार असून यामुळे सुमारे दोनशे शेतकरी बाधीत होणार आहेत. या शेतकऱ्यांनी आपले आक्षेप सक्षम अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कडे २३ दिवसात लेखी स्वरूपात करण्याची अधिसूचना जारी केल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. वाडा तालुक्यातील निबंवली गोराड हा परिसर दुर्गम म्हणून गणला जातो. यात आदिवासी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी जाणार असून त्यातील काही शेतकरी तर भूमिहीन होणार आहेत. या नियोजित रस्त्यावर येणारी अनेक घरे असून त्यांना बेघर होण्याची वेळ येणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीचीही विभागणी या रस्त्यामुळे होणार असून शेतीचे रस्तेही बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. या परिसरासाठी लोहोपे बंधाऱ्यातून शेतीसाठी पाणी घेतले जाते. या रस्त्यामुळे शेतीचे दोन भाग होऊन शेतकऱ्यांची उन्हाळी शेतीचा प्रश्न ही बिकट होणार आहे. (वार्ताहर)