शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथ, रस्त्यावरील अतिक्रमणाने नागरीक हैराण

By admin | Updated: October 6, 2015 23:52 IST

शहरातील मुख्य वाहतुकीच्या मार्गावरील फुटपाथ तसेच रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून वहातूकीस अडथळा केला आहे. मात्र, एवढी अतिक्रमणे होऊनही मनपाचा

भिवंडी : शहरातील मुख्य वाहतुकीच्या मार्गावरील फुटपाथ तसेच रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून वहातूकीस अडथळा केला आहे. मात्र, एवढी अतिक्रमणे होऊनही मनपाचा अतिक्रमण विभाग काही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांत संताप आहे.शहरातील मुख्य बाजारपेठ, मंडई प्रभूआळी, पारनाका ते शिवाजी चौकापर्यंत चारचाकी वाहने रस्त्यात उभी करून त्यांचे मालक बाजारहाट करण्यासाठी जातात. फेरीवाले व हातगाडीवाल्यांनी हा रस्ता नेहमी व्यापलेला असल्याने नेहमी वाहतूक कोंडी होते. यामधून नागरीकांना दुचाकी वहाने चालविणे कठीण झाले आहे. बीजेपी दवाखाना, पारनाका, भिवंडी टॉकिज, कासारआळी चौक व नझराना चौक येथे कायम वहातूक कोंडी असल्याने पाच मिनिटांचा हा रस्ता पार करण्यासाठी कधी कधी तर तब्बल अर्धा तास लागतो. तसेच मंडई ते आनंद दिघे चौक दरम्यान लाला शॉपिंग ते हनुमान बावडी, कोटरगेट मशीदजवळ वहातूक कोंडी होते. मंडई ते धामणकरनाका दरम्यान बोबडे कंपाऊण्डजवळ, धामणकरनाका ते एस.टी.दरम्यान कणेरी हत्ती सायझिंग समोर, राजीवगांधी चौक, जकातनाका, एस.टी.स्थानक या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. कल्याण रोडवर आजबीबी ते पाईपलाईन दरम्यान नेहमी वहातूक कोंडी होत असते. शहरातील या मुख्य मार्गावर बंद गाड्याही उभ्या असतात. तर कोठे फेरीवाल्यानी व हातगाड्यांनी अतिक्रमण केलेले असते. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने व शहर वाहतूक पोलीसांनी स्थानिक पोलीस ठाण्याचा बंदोवस्त घेऊन ही धडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (प्रतिनीधी)उपायुक्तांचा प्रतिसाद नाही-महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग कार्यान्वीत नसल्याच्या तक्रारीसाठी उपायुक्ता विजया कंठे यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर शहर वहातूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक व्ही.एन.कारकुट यांनी प्रत्यक्ष पहाणी करून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या वहानांवर कारवाई केली आणि लवकरच या मार्गावर दुचाकी वहानांना तारखेनुसार पार्किंगसाठी अधिसूचना जाहिर करणार असल्याचे सांगीतले. -श्रावण महिना व गणेशोत्सवा दरम्यान या सर्व मार्गावर वहातूक कोंडी झाल्याच्या तक्रारी असताना मनपाने कोणतीही कारवाई केली नाही.तर वहातूक पोलीस गणेशोत्सवाच्या काळात दिसले. पुढे नवरात्रोत्सव व दिवाळी हे सण येत असल्याने शहर वहातूक पोलीस व मनपा प्रशासनाने संयुक्तीक कारवाई करावी, अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.