शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

छोटा शकील हाच मुख्य सूत्रधार, इक्बाल कासकरला शस्त्रखरेदीसाठी रसद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 06:05 IST

ठाणे पोलिसांचा मोर्चा आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार छोटा शकीलकडे वळला आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकर याची टोळी छोटा शकील चालवत असून, खंडणीच्या गुन्ह्यांचा तोच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

ठाणे : ठाणे पोलिसांचा मोर्चा आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार छोटा शकीलकडे वळला आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकर याची टोळी छोटा शकील चालवत असून, खंडणीच्या गुन्ह्यांचा तोच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे इक्बालविरूद्ध मोक्का लावण्याची तयारी पोलिसांनी चालवली आहे.ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी इक्बाल कासकरसह तिघांना ठाणे पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी अटक केली होती. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात इक्बालच्या टोळीकडून खंडणी वसुलीचा उद्योग सुरू होता.त्याच्या या धंद्याचा सूत्रधार छोटाशकील असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दाऊद भारतातून फरार झाल्यापासून डी-कंपनीची सूत्रे छोटा शकीलकडेच आहेत. इक्बाल कासकर हा दाऊदचाभाऊ असल्याने खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये शकीलने त्याला मदत केली. शस्त्र खरेदीसाठीही त्याने इक्बालला पैसा पुरविल्याचा संशय पोलिसांना आहे. इक्बालच्या हवाला रॅकेटमध्येही शकीलचा सहभाग पोलिसांना आढळला आहे.त्यामुळे दक्षिण आशियातील सर्वांत मोठा माफिया म्हणून कुख्यात असलेल्या छोटा शकीलच्या मुसक्या आवळण्यासाठी ठाणे पोलिसांनी हालचाल सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.गांगरचा पोलिसांना गुंगाराइक्बालच्या टोळीला आर्थिक रसद पुरवणाºयांमध्ये बोरीवली येथील पंकज गांगरचे नाव समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तो फरार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाने बुधवारी न्यायालयामध्ये दिली.पोलीस कोठडीत वाढइक्बाल कासकर, मुमताज इजाज शेख आणि इसरार अली जमील सैय्यद यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.टी. इंगळे यांच्या न्यायालयासमोर बुधवारी दुपारी हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली. न्यायालयात हजर केले तेव्हा नशाबाज इक्बालचे हात थरथरत होते.भावाशी बोलण्यात गैर काय?दाऊद हा इक्बालचा भाऊ आहे. त्यामुळे भावाशी बोलण्यात गैर काय, असा प्रश्न इक्बालचे वकील अ‍ॅड. श्याम केसवानी यांनी न्यायालयामध्ये केला.

टॅग्स :Crimeगुन्हा