भिवंडीत डाइंगचे रासायनिक पाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:40 IST2021-03-05T04:40:28+5:302021-03-05T04:40:28+5:30

भिवंडी : ग्रामीण भागात अंजूरफाटा-वसई महामार्गावर असलेल्या कालवार येथील गणराज कम्पाउंड या गोदाम संकुलात असलेल्या वल्लभ आर्ट या डाइंगमालकाकडून ...

Chemical water of Dyeing in Bhiwandi on the road | भिवंडीत डाइंगचे रासायनिक पाणी रस्त्यावर

भिवंडीत डाइंगचे रासायनिक पाणी रस्त्यावर

भिवंडी : ग्रामीण भागात अंजूरफाटा-वसई महामार्गावर असलेल्या कालवार येथील गणराज कम्पाउंड या गोदाम संकुलात असलेल्या वल्लभ आर्ट या डाइंगमालकाकडून सरकारी नियमांची पायमल्ली सुरू असून डाइंगमधून निघणारे रासायनिक पाणी थेट रस्त्यावर सोडण्यात येत असल्याने रस्त्यावर हिरव्या रंगाचे पाणी साचत आहे. या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांनी याविषयी डाइंगमालकाला अनेकवेळा समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, डाइंगमालकाकडून रासायनिक पाणी रस्त्यावर सोडण्याचा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे आम्हाला नाहक त्रास होत आहे, अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिक सुनील म्हात्रे यांनी दिली. यासंदर्भात चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली.

---------------------

फोटो ओळ : डाइंगमालकाकडून रासायनिक पाणी सोडले जात असून त्याला हिरवा रंग आला आहे. (छाया : नितीन पंडित)

Web Title: Chemical water of Dyeing in Bhiwandi on the road