शहरं
Join us  
Trending Stories
1
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
2
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
3
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
4
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
5
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
6
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
7
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
8
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
9
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
10
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
11
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
12
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
13
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
14
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
15
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
16
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
17
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
18
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
19
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
20
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त घरांच्या आमिषाने हजारोंना चुना

By admin | Updated: March 22, 2016 02:05 IST

नेव्ही, आर्मी मधील सेवानिवृत्त कर्मचारी, रिक्षाचालक, फेरीवाले इ. नी आयुष्यभर मेहनत करून जमवलेल्या रक्कमेतून आगाशी, विरार येथील आमोनिक इको सिटी व क्रिस्टल होमीयोकॉन

पालघर : नेव्ही, आर्मी मधील सेवानिवृत्त कर्मचारी, रिक्षाचालक, फेरीवाले इ. नी आयुष्यभर मेहनत करून जमवलेल्या रक्कमेतून आगाशी, विरार येथील आमोनिक इको सिटी व क्रिस्टल होमीयोकॉन प्रायव्हेट लिमिटेड या रहिवासी गृहसंकुलामध्ये घरासाठी ४ ते ५ लाख रूपये गुंतवले. परंतु चार वर्षापासून घरे न देता तिसऱ्याच पार्टीला सर्व मालमत्ता विकून प्रकल्पाचे मालक व व्यवस्थापक पसार झाले आहेत. या सर्वांविरोधात पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करूनही त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जात नसल्याच्या निषेधार्थ फ्लॅट ग्राहकांनी पालघर रेल्वे स्टेशन ते पोलीस अधिक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा आयोजित केला होता.
विरार येथील आगाशी रोडवरील जे. पी. नगर येथे आमोनीया इको सिटी या रहिवाशी संकुलाच्या प्रकल्पाच्या मोठमोठ्या जाहीराती आकर्षकरित्या झळकू लागल्याने व चांगल्या परवडणाऱ्या भावात फ्लॅट मिळणार असल्याने सिव्हील आॅफीसर, नेव्ही, आर्मी कर्मचारी, रिक्षावाले, फेरीवाले, कामगार इ. सुमारे १४०० ते १५०० ग्राहकांनी प्रत्येकी सुमारे ४ ते ५ लाख रूपये गुंतवणूक केली.
या प्रकरणातील तारीक शौकत चुनेवाला, मो. आजम अब्दुल अजीज खान, विश्राम सावंत, प्रसाद बागवे, प्रमोद सावंत, संगीता नरेंद्र अग्रवाल, जयेंद्र कमळाकर पाटील, प्रतीक मुकेश जैन इ. फसवणूक करणाऱ्या विरोधात मुख्यमंत्री, पालघर पोलीस अधिक्षकाकडे सहा महिन्यापासून तक्रार करूनही आरोपी विरोधात कुठलीही कारवाई केली जात नाही. सरळ सरळ आमची आयुष्यभराची कमाई लुबाडली जात असताना प्रशासन करते तरी काय? असा उद्वेगपूर्ण प्रश्न उपस्थित केला.
शनिवारी सकाळी ११ वाजता शेकडो रहिवाशांनी पालघर स्टेशन ते पोलीस अधिक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा आयोजित केला होता. जोपर्यंत सक्षम अधिकारी खाली उतरून आमच्याशी चर्चा करीत संबंधीत आरोपी विरोधात गुन्हे दाखल
करून त्याला अटक करीत
नाही. तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही असे सांगून त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर भर उन्हात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. (वार्ताहर)
> दीड ते दोन वर्षात घरे दिली जातील इ. विविध प्रलोभने देऊन हजारो लोकांनी गुंतवणूक (सुमारे ७० कोटी) केल्यानंतर घरे देण्यास टाळाटाळ होऊ लागली. त्यानंतर आमोनीक इको सिटी व्यवस्थापकाने आपला प्रकल्प परस्पर क्रिस्टल होमीयोकॉन प्रा. लि. यांना विकून टाकला. त्यामुळे आता तुम्हाला घरे हवी असतील तर वाढीव रक्कम भरावी लागते असे सांगितल्याने शेवटी नाईलाजाने आम्ही वाढीव रक्कमही भरल्याचे प्लॅटधारक रोबीत जिंदल यांनी सांगितले.
मात्र त्या नंतर पुन्हा सर्व गुंतवणूकदारांची फसवणूक करून क्रिस्टल होमीयोकॉन या व्यवस्थापकाने हा प्रकल्प तिसऱ्याच पार्टीला परस्पर विकून टाकला. त्यामुळे आयुष्याची कमाई या घरामध्ये गुंतवणूक केली असताना आमची मोठी फसवणूक केली जात असल्याची परिस्थिती त्यांनी लोकमत पुढे मांडली.