शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

तीन हजारांच्या वृक्षकत्तलीला राष्ट्रवादीचे ९ हजार वृक्षारोपणाने दिले पालिकेला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 5:27 PM

एकीकडे ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने शहरातील तीन हजार वृक्ष तोडीला परवानगी दिली असतांना, त्याला आता सडेतोड उत्तर राष्ट्रवादीने दिले आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून पहिल्या टप्यात सोमवारी १०० वृक्षांची लागवड करण्यात आली.

ठळक मुद्देशहराच्या विविध भागात करणार ९ हजार वृक्षांची लागवडवृक्ष लागवडीनंतर घेतली शपथ

ठाणे : सत्ताधारी शिवसेना आणि ठाणे महानगर पालिका प्रशासनाने कधी विकासकांच्या फायद्यासाठी तर कधी मेट्रो रेल्वेसाठी सुमारे तीन हजार वृक्षांची कत्तल करण्याचा ठराव पारीत केला आहे. त्याला उत्तर म्हणून ठाणे शहराच्या विविध भागात सुमारे ९ हजार वृक्षांचे स्वखर्चाने रोपण करु न ते वाढविण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसने वर्धापन दिनाच्या अनुषंगाने सोडला आहे. त्याची सुरु वात सोमवारी अय्यपा मंदिरामागील डोंगरावर झाडांची लागवड करु न केली.              राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश सरचिटणीस तथा जेष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या उपक्र माला सुरु वात करण्यात आली. अय्यप्पा डोंगराच्या मागे असलेल्या वनखात्याच्या डोंगरावर सोमवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी १०० झाडांचे रोपण केले. तसेच, ही झाडे जगवण्याची शपथही घेतली. या प्रसंगी बोलताना राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, ठाणे महानगर पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेने संगनमत करु न ठाणे शहरातील पर्यावरणाला धोका निर्माण केला आहे. ठाणे शहरात सत्ताधारी आणि प्रशासन बेलगाम वृक्षतोड करीत आहे. कधी मेट्रोच्या नावावर तर कधी विकासकांच्या फायद्यासाठी. गेल्याच महिन्यात ३ हजार झाडे ठाणे शहरात तोडण्यात आली. सोमवारी वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी प्रण घेतला आहे की ९ हजार झाडे आम्ही या ठाणे शहरात लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेforestजंगलNCPराष्ट्रवादी काँग्रेस