शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

चक्री भजन स्पर्धा

By admin | Published: October 14, 2015 2:12 AM

संत तुकाराम महाराज समाज प्रबोधन संस्था व राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी कलावंताची चक्री भजन स्पर्धा घेण्यात आली.

शौकत शेख, डहाणूडहाणू शहरातील लोणीपाडा ईराणी रोड हा मुख्य रहदारीचा रस्ता अडवून फेरीवाल्यांनी हातगाड्या लावल्याने डहाणूकरांना रस्त्यातून मार्ग काढणे अवघड झाले आहे. भाजी आणि वडे -भजी विकणाऱ्या फेरीवाल्यांनी थेट गाड्या थाटून रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाहतुकदार आणि रहिवाशांना दररोजच्या भांडणाला तोंड द्यावे लागत आहे. रिलायन्स थर्मल पॉवर या प्रकल्पाकडे जाण्यासाठी लोणीपाडा येथूनच एकमेव मार्ग आहे. मात्र या मुख्य रस्त्यावरच फेरीवाले बसल्याने पालिकेचा रस्ताच गायब झालेला आहे. एकीकडे जागोजागी पडलेल्या मोठमोठया खड्डयातून वाट काढण्याची कसरत करावी लागत असतानाच फेरीवाल्यांमुळे रहिवाशांचा ये जा करण्याचा मार्ग अडला आहे. त्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण झाला असून दररोजच्या भांडणांनी लोक त्रस्त झाले आहेत.डहाणू पोलीस चौकीच्या पाठीमागे डहाणू नगरपालिकेने भाजी विक्रेत्यांसाठी महात्मा गांधी भाजी मार्केट ही ५२ गाळयांची स्वतंञ्य इमारत उभारून भाजी विक्रेत्यांचा जागेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. माञ भाजी विक्रेत्यांनी स्वत:च्या मनमानीने मार्केटच्या इमारतीत न बसता मुख्य रहदारीच्या रस्त्यावर जागा अडवून बेकायदा गाडया थाटून अतिक्रमण केले आहे. डहाणू पोलीस ठाणेही यातून सुटले नाही. डहाणू पोलीस ठाण्याच्या कंपाऊंडच्या चोहोबाजूंना विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने डहाणूचे पोलीस ठाणेच अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहे. डहाणू पालिका क्षेत्रातील रस्त्यावरील अतिक्रमणाला नगर परिषदेचे उदासिन धोरणच कारणीभूत असून डहाणूतील विक्रेत्यांचा जागेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात अपयशी ठरली आहे. थर्मल पॉवर रोड, पोलीस ठाण्याच्या आजूबाजूचा परिसर आणि इराणी रोड या भागात भाजी विक्रेत्यांनी जागेअभावी थेट रस्त्यावर उतरून दुकाने थाटल्याने वाहतूक आणि रहदारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. डहाणू नगरपषिदेचे भाजी विक्रेत्यांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण नाही.या सर्व गदारोळात डहाणूकरांना माञ मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणाच्या दररोजच्या ञासाला तोंड द्यावे लागत आहे.