शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर पालिकाच सुरू करणार बससेवा

By admin | Updated: December 29, 2015 00:56 IST

खाजगी ठेकेदारामार्फत सुरू केलेली परिवहन सेवा बंद पडल्यानंतर आता महापालिकेने स्वत:ची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या वर्षी पाच बस खरेदी करून ही परिवहन

- सदानंद नाईक,  उल्हासनगरखाजगी ठेकेदारामार्फत सुरू केलेली परिवहन सेवा बंद पडल्यानंतर आता महापालिकेने स्वत:ची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या वर्षी पाच बस खरेदी करून ही परिवहन सेवा सुरू केली जाईल. नंतर, दरवर्षी पाच बस खरेदी करून सेवेचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाईल, असा निर्णय घेतल्याची माहिती आयुक्तांनी दिली.उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना-भाजपाची सत्ता आल्यानंतर खाजगी ठेकेदारामार्फंत धूमधडाक्यात परिवहन बससेवा सुरू केली होती. तिकीट दरवाढीवरून पालिका आणि ठेकेदारात तू तू मैं मैं झाल्यावर बससेवा ठेकेदाराने बंद केली. दरम्यानच्या काळात पालिकेच्या हद्दीअंतर्गत बससेवा सुरू करण्याची मागणी राजकीय पक्षांसह सिंधू फं्रट संघटनेने केली आणि त्यासाठी आंदोलने केली, उपोषणे केले. तत्कालीन महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या प्रयत्नांमुळे केडीएमटीच्या मदतीने शहरातील मुख्य सात मार्गांवर बससेवा सुरू झाली. मात्र, नंतर त्या बसही दिसेनाशा झाल्यावर पालिकेने स्वत: परिवहन सेवा सुरू करण्याची मागणी सेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, अधिकारी धीरज ठाकूर यांनी लावून धरली. जुन्या कामगारांना सामावून घ्यामहापालिकेने खाजगी ठेकेदारामार्फत सुरू केलेली परिवहन सेवा बंद पडल्याने त्यातील शेकडो कामगार बेकार झाले. त्या कामगारांना पालिका परिवहन सेवेत सामावून घेण्याची मागणी कामगार संघटनेचे नेते अरुण आशान यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.