शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

ठाण्यात वर्तकनगरच्या पोलीस अधिकारी वसाहतीमधील इमारत ठामपाने केली सील

By जितेंद्र कालेकर | Published: May 19, 2020 5:55 PM

ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षामधील सहा कर्मचाऱ्यांना गेल्या तीन दिवसांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्तांसह १४ पोलीस कोरोनाबाधित झाल्याने या कार्यालयातील कर्मचा-यांचे संख्याबळ आणण्याचा निर्णय पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी घेतला आहे. तर एका कर्मचा-याला लागण झाल्यामुळे वर्तकनगर येथील पोलीस अधिका-यांची एक इमारत ठाणे महापालिकेने सील केली आहे.

ठळक मुद्देमुंब्रा येथील आणखी एका पोलिसाला लागणपोलीस आयुक्त कार्यालयातील एसीपींसह १४ पोलीस कोरोनाबाधितनियंत्रण कक्षातील महिला अधिकाऱ्याची कोरोनातून मुक्तता

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंब्रा पोलीस ठाण्याच्या आणखी एका कर्मचा-याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे वर्तकनगर येथील पोलीस अधिकारी वसाहतीमधील दोन पैकी एक इमारत ठाणे महापालिकेने सोमवारी सील केली आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त कार्यालयातील एका सहाय्यक आयुक्तांसह (एसीपी) १४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर नियंत्रण कक्षातील महिला अधिकाºयाने कोरोनावर मात केल्याने समाधान व्यक्त होत आहे.मुंब्रा पोलीस ठाण्यात नियुक्तीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाºयाला रविवारी रात्री कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना मुंब्रा येथूनच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ते वास्तव्याला असलेल्या ठाण्यातील वर्तकनगर पोलीस अधिकारी वसाहतीमधील दोन पैकी एक इमारत ठाणे महापालिकेने सोमवारी सकाळी ‘सील’ केली. या इमारतीमधील सर्व १८ कुटूंबीयांना होम कॉरंटाईन केले असून त्यांना सर्व अत्यावश्यक सुविधा या ठाणे महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणार आहेत. या पोलीस वसाहतीमध्ये प्रथमच कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे पोलीस अधिकारी तसेच त्यांच्या कुटूंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.पोलीस आयुक्त कार्यालयातील एका सहाय्यक पोलीस आयुक्तांसह आतापर्यंत १४ कर्मचाºयांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये नियंत्रण कक्षातील दहा आणि विशेष शाखेतील एकाचा समावेश आहे. याशिवाय, वागळे इस्टेट आणि ठाणेनगर या पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका कर्मचाºयाचाही अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. नियंत्रण कक्षामध्ये गेल्या तीन दिवसात सहा पोलिसांना लागण झाली आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षातील बाधितांची संख्या ही दहावर पोहचली आहे.* पोलीस कुटूंबाची कोरोनावर मातठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षातील महिला उपनिरीक्षक आणि तिचा मुंबईतील उपनिरीक्षक पती, सासू, आणि दोन वर्षांची मुलगी हे सर्व कुटूंब आता कोरोनातून मुक्त झाले आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षातील दहापैकी नऊ जणांवर आता रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच विशेष शाखेतील कर्मचा-यानेही कोरोनावर मात केल्यामुळे त्यालाही आता रुग्णालयातून घरी सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

* आयुक्त कार्यालयातील संख्याबळ आता ५० टक्के राहणार‘‘ठाणे पोलीस नियंत्रण कक्षातील दहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. हे खरे आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून या कक्षासह आयुक्त कार्यालयातील कर्मचा-यांचे संख्याबळ हे निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. यातून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.’’विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस