शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

आमचा बाप व्हायचा प्रयत्न केला, तर त्याला त्याचा बाप दाखवून देऊ; मंत्री गणेश नाईकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 06:34 IST

अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करण्यासाठी नाईक अंबरनाथमध्ये आले होते.

अंबरनाथ - नगरपरिषदेवर यंदा भाजपचीच सत्ता येणार, कोणाची इच्छा असो किंवा नसो अंबरनाथ शहराचा, ठाणे जिल्ह्याचा विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून आम्हीच करू, जर कोणी प्रेमाने समजावून सांगितलं तर त्याला गाडीत जागा नसताना अडचण सहन करून जागा देऊ, मात्र कोणी जर बाप व्हायचा प्रयत्न करत असेल तर त्याला त्याचा बाप दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी कोणाचेही नाव न घेता भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत शुक्रवारी विरोधकांना दिला.

अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करण्यासाठी नाईक अंबरनाथमध्ये आले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना यंदा अंबरनाथ, बदलापूर शहरात भाजपचीच सत्ता येणार. तसेच नवी मुंबई प्रमाणे शहराचा विकास करण्यासाठी अंबरनाथ शहर दत्तक घेत असून सहा महिन्यांत शहरात परिवहन सेवा सुरू करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सतर्क राहा, रात्र वैऱ्याची आहे, असा कानमंत्रही दिला. येथील पोलिस उपायुक्तांशी बोलणे केले आहे, त्यांना सांगितले आहे ज्या वार्डात जे गुंड दहशत माजवून मस्ती करतील ते रेकॉर्डला द्या. भाजपच्या नव्हे तर आघाडीच्या लोकांवर देखील अन्याय होता कामा नये, कुठे गुंडागर्दी झाली तर चिंता करू नका, पोलिसांमार्फतच बंदोबस्त करू, तुमच्या सोबत पूर्ण ताकदीने उभा आहे, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांना नाईक यांनी दिला.

अंबरनाथ- बदलापूरच्या स्वतंत्र महापालिका करू

मागील काही वर्षे सतत चर्चेत असलेल्या अंबरनाथ-बदलापूर एकत्र महापालिका करण्याबाबत मंत्री नाईक यांनी स्पष्टीकरण दिले. माझ्या मनात अंबरनाथ-बदलापूर एकत्रित महापालिका करावी, अशी संकल्पना होती. मात्र कुळगाव बदलापूरची लोकसंख्या इतकी आहे की, त्यांचीच स्वतंत्र महानगरपालिका होऊ शकते, ही बाब आ. किसन कथोरे यांनी निदर्शनास आणली. अंबरनाथची देखील स्वतंत्र महापालिका होण्याइतकी लोकसंख्या आहे. त्यामुळे दोन्ही शहरांच्या स्वतंत्र महापालिका होण्यासाठी प्रयत्न करू, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ganesh Naik warns rivals: We'll show them their place.

Web Summary : Minister Ganesh Naik asserted BJP's dominance in Ambernath, promising development under Fadnavis. He warned rivals against challenging their authority, vowing to retaliate strongly. Naik also pledged support to BJP workers and proposed separate municipal corporations for Ambernath and Badlapur.
टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे