शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव मंडळांवर सवलतींची खैरात

By admin | Updated: September 1, 2016 03:08 IST

एकीकडे ठाणे महापालिकेने गणेशोत्सव मंडळांसाठी आदर्श आचारसंहिता तयार करून तिचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे : एकीकडे ठाणे महापालिकेने गणेशोत्सव मंडळांसाठी आदर्श आचारसंहिता तयार करून तिचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नियमांचे उल्लघंन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांसाठी आकारण्यात येणारी एक लाखाच्या दंडाची नोटीसही पालिकेने मागे घेतली आहे. असे असताना आता आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर डोळा ठेवून या गणेशोत्सव मंडळांमार्फत उभारण्यात येणारे मंडप, कमानी, बॅनर आदींसाठी पालिकेने ठरवलेले दरही तब्बल ८० टक्के कमी करण्याचा घाट बुधवारी झालेल्या महासभेत घातला गेला. सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधकांनीदेखील याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने गणेशोत्सव मंडळांना सवलतींची खैरात मिळाली आहे. रस्त्यावर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांसाठी किंबहुना इतर सर्वच उत्सवांसाठी महापालिकेने आदर्श आचारसंहिता तयार केली आहे. तिचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांना पालिकेने एक लाख रुपयाची नोटीस बजावली होती. सर्वपक्षीयांनी विरोध केल्याने अखेर ती नोटीस मागे घेतली. त्यानंतर, आता पुन्हा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास पालिकेने सुरुवात केली. मात्र, आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय मंडळींनी गणेशोत्सव मंडळांमार्फत आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू केले आहे. मंडळांनी उभारलेले मंडप, कमानी, फलक आदींसाठी पालिकेने विविध स्वरूपांचे दर आकारले होते. ते भरणे मंडळांना शक्य नसल्याची भूमिका शिवसेनेचे नगरसेवक दशरथ पालांडे यांनी मांडली. त्याला इतर नगरसेवकांनीदेखील पाठिंबा दिला. कल्याण-डोंबिवली महापालिकेने ज्या पद्धतीने दर कमी केले आहेत, त्याच धर्तीवर ते करावेत, अशी भूमिका इतर नगरसेवकांनी मांडली. हे दर गणेशोत्सवाच्या काळापुरते न ठेवता इतर सणांसाठीदेखील तसेच ठेवावे, असा ठराव मांडण्याची विनंती शिवसेनेचे नगरसेवक अशोक वैती यांनी केली. विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी तसा ठराव मांडला, तर सभागृह नेत्या अनिता गौरी यांनी अनुमोदन दिले. उत्सवासाठी मंडपउभारणी, फलक आणि कमानीसाठी महापालिकेने ठरवलेल्या दरात तब्बल ८० टक्के सवलत देण्याचा निर्णय या माध्यमातून घेण्यात आला.