शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी प्रचारामध्ये पिछाडीवर

By admin | Updated: October 26, 2015 02:26 IST

केडीएमसीच्या निवडणूक प्रचाराला आता वेग आला असला, तरीही सेना-भाजप, मनसेव्यतिरिक्त त्यात फारसा कोणीही जोर धरलेला नाही.

अनिकेत घमंडी, डोंबिवलीकेडीएमसीच्या निवडणूक प्रचाराला आता वेग आला असला, तरीही सेना-भाजप, मनसेव्यतिरिक्त त्यात फारसा कोणीही जोर धरलेला नाही. आघाडीच्या राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये नेमके बंडखोर कोणाचे, यावरून अंतर्गत धुसफूस सुरू आहे. त्यामुळे प्रचारात त्यांच्या उमेदवारांची पिछाडी असल्याचे दिसून येत आहे. भाजपने मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची फौज, तर शिवसेनेने सिने-नाट्य कलाकारांची फौज प्रचाराला आणली. मनसेनेही पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनाच येथे आणले. मात्र, काँग्रेससह राष्ट्रवादीने मात्र कोणतेही मातब्बर नेते येथे न उतरवल्याने या पक्षांचे नेमके अस्तित्व आहे की नाही, अशी चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून कल्याण ग्रामीणमध्ये, तसेच डोंबिवलीत जिमखाना येथे सभा घेतल्या आहेत, तर पंकजा मुंडे यांनीही या ठिकाणी येऊन उमेदवारांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेनेही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठिकठिकाणच्या प्रचार कार्यालयांचा शुभारंभ केला. काँग्र्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र आपापल्या पद्धतीनेच कार्यालये, रॅली, चौकसभा कराव्या-उरकाव्या लागत आहेत. इंदिरानगर, पाथर्ली परिसरात प्रचंड रस्सीखेच दिसून येत आहे. डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक मंदावली असून, त्यांची धडधड वाढवण्यासाठी पंजाही पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची नावपुरतीच आघाडी दिसते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संबंधित उमेदवारांना आपापल्या परीने कार्यकर्ता फळी तयार करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. एकमेकांवर अवलंबून राहू नका, असाही सल्ला देण्यात आल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. कल्याण ग्रामीणमध्ये तर उमेदवारच दिलेले नसल्याने, त्या ठिकाणी या दोन्ही पक्षांचा प्रचार संपुष्टात आल्यातच जमा आहे. यांनी संघर्ष समितीला पाठिंबा दिल्याने तेथे पक्षस्तरावर अर्ज न भरल्याचे काँग्र्रेस नेतृत्वाने सांगितले.