पार्टीच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार

By Admin | Updated: October 8, 2015 00:11 IST2015-10-08T00:11:07+5:302015-10-08T00:11:07+5:30

वाढदिवसाची पार्टी देण्याच्या बहाण्याने एका १५ वर्षीय तरुणीवर तिच्याच एका मित्रासह दोघांनी मद्य प्राशन करुन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार कोपरी भागात घडला.

The atrocities against the accused by the party's shedding | पार्टीच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार

पार्टीच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार

ठाणे : वाढदिवसाची पार्टी देण्याच्या बहाण्याने एका १५ वर्षीय तरुणीवर तिच्याच एका मित्रासह दोघांनी मद्य प्राशन करुन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार कोपरी भागात घडला. विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्याच्या विवाहित चुलत बहिणीनेही कपडे काढून आपणाला मारहाण केल्याचा आरोप पिडीत तरुणीने केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल होताच कोपरी पोलिसांनी आरोपींना मदत करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक केली आहे.
पिडीत तरुणीचा वसंत विहार येथील मित्र कौस्तुभ चव्हाण (२१) याने वाढदिवसाची पार्टी देण्याचे कारण सांगून ३० सप्टेंबर रोजी मोटारसायकलवरुन कोपरीतील आपल्या चुलत बहिणीच्या घरी नेले. तिथे त्याच्या त्या बहिणीने मुलीला मारहाण करुन तिचे कपडे काढले. त्यानंतर दुपारी २.३० ते सायंकाळी ६ वा. च्या दरम्यान मद्यधुंद अवस्थेत कौस्तुभ आणि मंदार ठाकूर (३०) या दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. भीतीपोटी तिने हा प्रकार घरी सांगितलाच नाही. ५ आॅक्टोंबरला तिच्या पोटात दुखू लागल्यामुळे वैद्यकीय तपासणीत हा प्रकार उघड झाला. अखेर घडलेला प्रकार तिने आई वडिलांना सांगितला. हा प्रकार कळल्यानंतर धक्काच बसलेल्या तिच्या पालकांनी तातडीने कोपरी पोलीस ठाण्यात त्याच दिवशी रात्री ११ वा. च्या सुमारास याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ६ आॅक्टोंबर रोजी दुपारी १२ वा. च्या सुमारास कौस्तुभ, मंदार आणि कौस्तुभची बहिण अशा तिघांना अटक केली. या तिघांनाही ठाणे न्यायालयाने ९ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कौस्तुभ नवी मुंबईतील एका महाविद्यालयात डिप्लोमा करीत आहे. तर पिडीत मुलगी ठाण्यातील एका शाळेत दहावीला आहे. आधी दोघेही एकाच शाळेत असल्यामुळे त्यांची मैत्री होती. मात्र, याच मैत्रीचा गैरफायदा घेऊन त्यांनी तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती कोपरी पोलीसांनी दिली.
(प्रतिनिधी)

Web Title: The atrocities against the accused by the party's shedding