शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

भिवंडी इमारत दुर्घटनेत आणखी १५ मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 6:21 AM

मृतांचा आकडा ४१ वर; बचाव पथकांसमोर अडचणींचा डोंगर

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील जिलानी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ४१ जणांचा बळी गेला असून २५ जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या पहिल्या दिवशी १४, दुसऱ्या दिवशी १२ तर तिसºया दिवशी बुधवारी सर्वाधिक १५ मृतदेह हाती लागले आहेत. ६० तास उलटूनही इमारतीचा ढिगारा बाजूला करून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम बचाव पथकाकडून सुरूच आहे. त्यातच बुधवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बचाव पथकासमोर अडचणी निर्माण झाल्या; मात्र भरपावसात जवानांचे मदतकार्य सुरूच होते.कामगारनगरी म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहराची लोकसंख्या वाढली. वाढत्या लोकसंख्येसोबतच निवाºयाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे धनिकांनी बांधकाम व्यवसायाकडे मोर्चा वळविला आणि शहरात इमारती उभ्या करण्याची स्पर्धाच लागली. मात्र इमारत बांधकामासाठीच्या नियम व अटींकडे बांधकाम व्यावसायिकांनी दुर्लक्ष केल्याने अनधिकृत बांधकामे जोमाने वाढली. मागील सात वर्षांमध्ये शहरात तब्बल ५०० हून अधिक अनधिकृत इमारती उभ्या राहिल्याचा अंदाज आहे. नियम व अटींकडे दुर्लक्ष केल्याने या इमारती किती मजबूत असतील अथवा या इमारतींचे आयुष्य किती, यावर निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. अशा अनधिकृत इमारतींमुळे घडणाºया दुर्घटनांना नेमके जबाबदार कोण? याचा शोध घेणेदेखील गरजेचे आहे. भिवंडी मनपाच्या अखत्यारीत पाच प्रभाग समित्या असून, या पाचही समित्यांमध्ये आजही अनधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू आहेत. याकडे भिवंडी मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.भिवंडी पालिकेचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी अनधिकृत बांधकाम करणाºया एका व्यावसायिकाकडून तब्बल १५० रुपये प्रति चौरस फुटाप्रमाणे लाच घेत असल्याचा आरोप एका बांधकाम व्यावसायिकाने नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे. पालिकेचे अधिकारी या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी आपले हात धुऊन घेत आहेत. यातूनच भिवंडीत अनधिकृत बांधकाम फोफावल्याचा आरोप या व्यावसायिकाने केला आहे.

७८२ इमारती धोकादायकशहरात ७८२ धोकादायक इमारती असून, त्यापैकी २१० इमारती अतिधोकादायक असल्याचे मनपा प्रशासनाने जाहीर केले आहे. मनपा प्रशासनाने या इमारतींना केवळ नोटीस बजावल्या आहेत. या धोकादायक इमारतींवर कारवाई केलीच, तर स्थानिक नगरसेवकांचा दबाव येत असतो. त्यामुळे धोकादायक इमारतींवर कारवाई होताना दिसत नाही. जिलानी इमारत कोसळल्यानंतर मनपा प्रशासनाने कामतघर परिसरातील अतिधोकादायक मालमत्ता क्रमांक ६१, ६२ आणि ६३ या इमारतींचा विद्युत पुरवठा खंडित करून या तीन इमारती निर्मनुष्य केल्या आहेत. केवळ दिखावा म्हणून मनपा प्रशासनाने ही कारवाई केल्याचे दिसते. त्यामुळे भविष्यात जिलानी इमारतीप्रमाणे इतर दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाbhiwandiभिवंडी