शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

जुने गणपती मंदिर स्थलांतरित करण्यावरून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:18 IST

वाहतुकीस अडथळा : विकास आराखड्यानुसार १८ मीटर रस्ता, न्यायालयात दावा विरोधात गेला

मीरा रोड : भार्इंदर पोलीस ठाणे आवारातील जुने गणपती मंदिर रस्त्यात अडथळा ठरते म्हणून दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी आयुक्त, माजी आमदार, नगरसेवक आदींनी केलेल्या पाहणी व चर्चेवरून संतापाचे वातावरण झाले आहे. विकास आराखड्यानुसार येथे १८ मीटर रस्ता असतानाही नाहक वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर, उच्च न्यायालयात दावा विरोधात गेल्याने मंदिर स्थलांतरित करण्याच्या चर्चेसाठी गेल्याचे भाजपा नगरसेवकाचे म्हणणे आहे.

भार्इंदर पश्चिमेला पोलीस ठाण्याच्या आवारातच जुने गणपतीचे मंदिर आहे. ही पोलीस ठाण्याची भिंत व मंदिर पालिका विकास आराखड्यातील १८ मीटर रुंद रस्त्याने बाधित होत असल्याने दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार नरेंद्र मेहतांसह पालिकेने ते हटवण्यासाठी पुढाकार घेतला होता. पोलीस ठाण्याची भिंत तोडून टाकली होती. पण, मंदिराला नागरिकांचा मोठा विरोध झाला होता. दरम्यान, याप्रकरणी आय.जी. खंडेलवाल यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. परंतु, बुधवारी सकाळी माजी आमदार मेहतांसह भाजप नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, पालिका आयुक्त बालाजी खतगावकर, कार्यकारी अभियंता दीपक खांबित, माजी नगरसेवक आसिफ शेख, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव आदींच्या उपस्थितीत मंदिर स्थलांतरित करण्यासाठी पाहणी व चर्चा झाली. ही बाब समजताच भाविकांनी याचा निषेध करत कारवाईस विरोध केला.

या ठिकाणी रस्ता १८ मीटर इतका रुंद असून समोर रस्त्यात असलेला जुना क्रूस ख्रिस्तीबांधवांनी हटवल्यानंतर त्या ठिकाणी चक्क फेरीवाले आणि बेकायदा पार्किंग होत आहे. त्यावर पालिका आणि राजकारणी मूग गिळून आहेत. मंदिरामागे असलेल्या इमारती, बांधकामेही बाधित होत असून ती आधी हटवण्याची गरज आहे. या ठिकाणी मुख्य नाक्यावरील रिक्षातळ पुढे नेला, तर वाहतूककोंडी होणार नाही. पण, यात काहीजण राजकारण करत असून ते चुकीचे असल्याचे प्रदीप भाटिया यांनी सांगितले. बाधित मंदिराची याचिका उच्च न्यायालयात निकाली निघाल्याने याचिकाकर्त्यांच्या विनंतीवरूनच आमचे आमदार मेहता व आम्ही पाहणी आणि चर्चेसाठी गेलो होतो. येथे रस्ता रुंदीकरण आवश्यक असल्याची मेहता व आमची आधीपासूनची भूमिका आहे. पण, नागरिकांच्या सहमतीनेच मंदिर स्थलांतरित केले जाईल, असे भाजप नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी सांगितले. आपण महापालिकेत जात असताना मंदिराजवळ हे सर्व थांबले होते. त्यांनी बोलावून घेतल्याने मी पाहणी व चर्चेत सहभागी झालो, असे पालिका आयुक्त बालाजी खतगावकर म्हणाले. या बाबतीत योग्य ती नियमानुसार कारवाई सहमतीने ठरवली जाईल.आवश्यक नसताना नाहक वादआवश्यकता नसताना नाहक हा वाद राजकारणी आणि प्रशासनाने निर्माण केला असून ज्या ठिकाणी वाहतुकीची व रहदारीची कोंडी होत आहे, अशा ठिकाणी पालिकेने मार्किंग करून दोनदोन वर्षे झाली तरी कारवाई करायला ही राजकारणी मंडळी का जात नाही, असा सवाल वेदाली परळकर यांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर