... अन् अजित पवारांनी डॉ. दीक्षितांचा डाएट प्लॅन मोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 13:04 IST2019-01-14T13:02:50+5:302019-01-14T13:04:28+5:30

बदलापूर येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ताईज किचन नावाने भोजनालय सुरू केले आहे.

... and Ajit Pawar broke Dr. Dixit Diet Plan in thane | ... अन् अजित पवारांनी डॉ. दीक्षितांचा डाएट प्लॅन मोडला

... अन् अजित पवारांनी डॉ. दीक्षितांचा डाएट प्लॅन मोडला

ठाणे - राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते आमदार अजित पवार यांनी भाजी पोळीची चव घेण्यासाठी चक्क डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा डाएट प्लॅन मोडला. कार्यकर्त्यांवरील प्रेमापोटी अजित पवारांनी भाजी पोळीचे दोन घास आपल्या पोटात टाकले. बदलापूर येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ताईज किचन नावाने भोजनालय सुरू केले आहे. त्यामध्ये अत्यल्प किमतीत पोटभर जेवण दिले जाते. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कॅप्टन आशिष दामले यांच्या पुढाकाराने मुरबाड येथे ताईज किचन हे भोजनालय सुरू करण्यात आले आहे. सध्या, राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार परिवर्तनाचा यात्रा सुरू असून त्यासाठी अजित पवार ठाणे जिल्ह्यात आले होते. त्यावेळी, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अजित पवारांनी ताईज किचनला भेट दिली. विशेष म्हणजे, यावेळी ताईज किचनमधील भाजी पोळीची चव घेण्याचा मोह अजित पवारांना आवरता आला नाही. अजित पवार हे डॉ. जगन्नाथ दीक्षितांचा डाएट प्लॅन फॉलो करतात. आपल्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याबाबतही ते तिकतेच गंभीर असतात. मात्र, कार्यकर्त्यांवरील प्रेमापोटी आणि ताईंच्या नावाने सुरू झालेल्या किचनमधील पदार्थांची चव घेण्यासाठी त्यांनी डॉ. दीक्षितांचा डाएट प्लॅनही मोडला. विशेष म्हणजे, पोळी भाजी खाल्ल्यानंतर दामले यांच्या या उपक्रमाचे कौतुकही अजित पवार यांनी केले.

पाहा व्हिडीओ -

Web Title: ... and Ajit Pawar broke Dr. Dixit Diet Plan in thane