शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा पेपर फोडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: October 19, 2015 01:04 IST

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील लिपीक तसेच टंकलेखक पदभरतीच्या १३४ जागांसाठी रविवारी पुन्हा दुसऱ्यांदा झालेल्या परीक्षेमध्येही टॅप्स केंद्र

हितेन नाईक, पालघर
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील लिपीक तसेच टंकलेखक पदभरतीच्या १३४ जागांसाठी रविवारी पुन्हा दुसऱ्यांदा झालेल्या परीक्षेमध्येही टॅप्स केंद्र, तारापूरमध्ये मोबाइल नेऊन त्याद्वारे उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या संगीता नारायण सुराडकर (३०), रा. जालना व वसईतील जी.जे. हायस्कूल केंद्रातील अरुण श्यामराव गवळी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले होते.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत ४ आॅक्टोबरला ५७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. परंतु, या परीक्षा केंद्रांपैकी पालघरमधील आर्यन शाळा परीक्षा केंद्रावर मोबाइल घेऊन त्याद्वारे प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण करणाऱ्या दोन परीक्षार्थ्यांना पालघर पोलिसांनी अटक केली होती. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर आणखी दोन अशा चौघांना अटक करण्यात आली होती. यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय असल्याने त्या दिशेने स्थानिक गुन्हे शाखेने आपल्या तपासाची चक्रे फिरवली होती. या परीक्षेत जास्त प्रमाणात पेपर लीक होण्याची शक्यता पाहता जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ४ आॅक्टोबरची परीक्षा प्रक्रिया रद्द करून १८ आॅक्टोबर रोजी पुन्हा परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते व त्यादृष्टीने या वेळी पालघर, बोईसर, वसई येथील ६० केंद्रांवर कडक बंदोबस्त ठेवला होता.
या परीक्षेसाठी २४ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. त्यापैकी १५ हजार ७८३ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. तर, ९ हजार १८१ विद्यार्थी अनुपस्थित राहिले होते.
सर्व परीक्षा केंद्रांवर जिल्हा प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. एकूण ६० केंद्रांवर प्रत्येकी ६ पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती. पाण्याची बाटली, पर्स, घड्याळ अशी कुठलीही वस्तू परीक्षा केंद्रात नेण्यास बंदी असूनही तारापूर टॅप्स केंद्रावरील परीक्षार्थी संगीता सुराडकर या महिलेने अंतर्वस्त्रामध्ये मोबाइल नेला. त्याचा वापर करीत असताना पर्यवेक्षकांनी तिला पकडले. तर, वसईमधील जी.जे. वर्तक हायस्कूल केंद्रामध्ये मोबाइल नेणाऱ्या अरुण गवळी या परीक्षार्थ्यालाही पर्यवेक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
हे दोघेही आरोपी नातेवाईक असल्याचे कळते. यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून महाराष्ट्र विद्यापीठ व इतर परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरव्यवहार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.