शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

क्लस्टरचा फायदा 'त्या' इमारतींना अशक्य

By admin | Updated: August 20, 2015 00:53 IST

क्लस्टर योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अधिकच्या एफएसआयमुळे ठाणे शहरातील पायाभूत सुविधांवर ताण पडणार नसल्याची माहिती पालिका आयुक्त संजीव

ठाणे : क्लस्टर योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अधिकच्या एफएसआयमुळे ठाणे शहरातील पायाभूत सुविधांवर ताण पडणार नसल्याची माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्वसाधारण सभेत दिली. तसेच क्लस्टर राबवताना ४० ते ४५ टक्के इमारती या अधिकृत असायला हव्यात, असे अनेक नियम असल्याने तिचा फायदा शहरातील १०० टक्के धोकादायक इमारतींना मिळेलच, याची शाश्वती नसल्याचेही पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण कधीही क्लस्टरविरोधात नव्हतो, असे घूमजाव करून प्रशासक म्हणून माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. क्लस्टरसंदर्भातील शिल्लक राहिलेली आपली भूमिका आयुक्तांनी बुधवारी सर्वसाधारण सभेमध्ये स्पष्ट केली. या वेळी त्यांनी सुरुवातीलाच घूमजाव करून माझा क्लस्टरला विरोध नव्हता, अशी भूमिका विशद केली. मुंबई आणि इतर शहरांमध्ये क्लस्टर योजना लागू केल्यानंतर याचा मोठा ताण शहरातील पायाभूत सुविधांवर पडणार असून यासंदर्भात कोर्टात एक याचिका दाखल झाली होती. पालिका आयुक्तांनी मात्र क्लस्टरसंदर्भात माहिती देताना या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या वाढीव एफएसआयचा ठाण्यातील पायाभूत सुविधांवर कोणत्याही प्रकारचा ताण पडणार नसल्याचे सांगितले. भविष्यात क्लस्टर योजनेत ७५% समावेश ठाणेकरांचा असल्याने बाहेरचे हा एफएसआय वापरणार नाहीत, अशा दृष्टीनेच आम्ही अहवाल तयार करत असल्याचे ते म्हणाले.