शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश ‘लॉक’; विद्यार्थी मनपसंत महाविद्यालयापासून राहणार वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:30 IST

ऑनलाइन प्रवेश बंधनकारक केल्याने पंचाईत

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  शैक्षणिक वर्ष २०२५-२६मधील ११वीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत अनुदानित आणि विनानुदानित महाविद्यालयांमधील व्यवस्थापन कोट्याच्या प्रवेशांवर टाच आली आहे. नव्याने लागू केलेल्या क्लिष्ट प्रणालीमुळे पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी कोट्यातून प्रवेश घेण्यात अयशस्वी ठरत असून, महाविद्यालयांच्या हातात आता काहीच राहिलेले नाही. 

पूर्वी व्यवस्थापन कोट्याचे प्रवेश थेट महाविद्यालयस्तरावर दिले जात होते. पालक विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार प्रवेश घेत होते. मात्र, यंदाच्या नव्या प्रक्रियेनुसार व्यवस्थापन कोट्याची नावे आधीच ऑनलाइन देणे बंधनकारक केले आहे. दुसऱ्या फेरीपर्यंत हे प्रवेश पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर उर्वरित जागा थेट प्रणालीकडे समर्पित होतील, अशी माहिती काही महाविद्यालयांनी दिली आहे. 

संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन झाल्यामुळे व्यवस्थापन कोट्याचे प्रवेश जवळपास थांबले आहेत. यामुळे महाविद्यालयांच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. महाविद्यालयाचा विकास, सुविधा, ॲक्टिव्हीटी, दुरुस्ती आणि विनानुदानित प्राध्यापकांचे वेतन यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

पालक, विद्यार्थी संभ्रमात

महाविद्यालयांना वेठीस धरू नका, कोटा हा संस्थेचा अधिकार आहे, याची जाणीव शासनाने ठेवावी, अन्यथा महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयांचा विकास गती हरवू शकतो, अशी खंत महाविद्यालयांनी व्यक्त केली. 

शिक्षणमंत्र्यांचे वेधले लक्ष 

विद्यार्थ्यास व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळतो का, याची चौकशी करावयाचे, जर त्याच्या इच्छेनुसार प्रवेश मिळत असेल तर तत्काळ मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घेऊन टाकायचे. आता नवीन प्रणालीमध्ये तसे करता न आल्याने पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नाहीत. पूर्वीप्रमाणे प्रवेश कालावधीतच मॅनेजमेंट कोटा ॲडमिशन चालू करण्याकडे ठाण्यातील महाविद्यालयांनी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले.

व्यवस्थापन कोट्याचे अधिकार पुन्हा महाविद्यालयांकडे द्या. या कोट्यातून ४५ ते ६५ टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी पसंतीच्या कॉलेजपासून वंचित राहत आहेत. - कमलेश प्रधान, सतीश प्रधान, ज्ञानसाधना महाविद्यालय.

नवीन प्रणालीमुळे अनुदानित विद्यार्थ्यांना विनानुदानित कोट्यात टाकले जाते. पूर्वी मुंबई, कोकण, पुणे हे स्वतंत्र विभाग होते. आता संपूर्ण महाराष्ट्र एकत्र केल्याने गोंधळ वाढला आहे. - सचिन मोरे, केबीपी कॉलेज.

मॅनेजमेंट कोटा अधिकृत असूनदेखील प्रवेश होत नाहीत, त्यात फी वाढवू शकत नाही, संस्थेचा विकास खुंटणार आहे. - डॉ. महेश बेडेकर, जोशी बेडेकर, महाविद्यालय.

 

टॅग्स :Admissionप्रवेश प्रक्रियाEducationशिक्षणCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन