कोरोना नियमांच्या उल्लंघनप्रकरणी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:16 IST2021-03-04T05:16:42+5:302021-03-04T05:16:42+5:30

---------------------------- दोन भामटे गजाआड कल्याण : बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. संजय मांगरे ...

Action for violation of Corona Rules | कोरोना नियमांच्या उल्लंघनप्रकरणी कारवाई

कोरोना नियमांच्या उल्लंघनप्रकरणी कारवाई

----------------------------

दोन भामटे गजाआड

कल्याण : बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. संजय मांगरे आणि नरेश जयस्वाल अशी त्यांची नावे आहेत. ते दोघे लोकांना बतावणी करून फसवीत व त्यांच्याकडून दागिने आणि पैसे घेऊन पसार होत होते. या दोघांनी अनेक जणांना गंडा घातला आहे. कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्थानकानजीक असलेल्या निलम गल्लीत एका नागरिकाला लुटतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यावर या दोघांची ओळख पटली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत या दोघांकडून चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

---------------------

मेंढ्या चोरणारा गजाआड

डोंबिवली : पूर्वेतील भोईरवाडी, शिवमंदिर परिसरात राहणाऱ्या सागर भोईर यांच्या तबेल्यातून तीन मेंढ्या चोरीला गेल्याची घटना रविवारी पहाटे ४ वाजता घडली होती. हा सर्व प्रकार सीसी कॅमेऱ्यात कैद झाला होता. टिळक नगर पोलिसांनी या आधारे मेंढ्या चोरणाऱ्या दोघा आरोपींना ४८ तासांत अटक केली. फैजल आयुब कुरेशी व इरफान गुलाम मोहमद मुल्ला, अशी आरोपींची नावे असून, ते सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण जाधव यांनी दिली.

----------

Web Title: Action for violation of Corona Rules