शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ७६७ रिक्षा चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:59 IST

ठाणे : कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगच्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यासाठी ठाणे ...

ठाणे : कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगच्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दोनपेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर बंदी घातलेली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांनी अशा ७६७ रिक्षाचालकांवर कारवाई करून ३ लाख ८७ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे. कलम १४४ नुसार जमावबंदीही लागू असून तिची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुनही कोरोना संबंधीच्या नियमांचे नागरिकांकडून पालन करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रिक्षातही दोनच प्रवाशांना प्रवासाची मुभा असताना मीटरप्रमाणे चालणाऱ्या तसेच शेअर रिक्षामध्येही दोनपेक्षा अधिक प्रवाशांची सर्रास वाहतूक केली जात आहे. अशा जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध १९ फेब्रुवारीपासून ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

* १९ फेब्रुवारी रोजी अशा ३४१ तर २० फेब्रुवारी रोजी ४२६ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध साथ प्रतिबंधक कायदा १८८ तसेच मोटार वाहन कायदा कलम १७७ नुसार पाचशे रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये ११ चालकांनी जागीच दंडाची ही रक्कम भरली. उर्वरित चालकांकडून १ लाख ६८ हजार ५०० रुपयांच्या दंडाची वसुली केली जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

* फ्रंट सीटवरूनही सर्रास प्रवास

शेअर रिक्षांमध्ये अनेक रिक्षाचालक मागे तीन आणि पुढे आपल्या शेजारीच उर्वरित प्रवाशांना बसवून नेतात. अशा फ्रंट सीटवर प्रवासी बसविणाऱ्या १०१ चालकांच्या विरोधातही शुक्रवारी कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.