शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

तक्रारदारच निघाला वाहने जाळणारा आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 10:54 PM

ठाण्याच्या गणेशवाडीत गुरुवारी पहाटे नऊ वाहनांना आगी लागण्याचा प्रकार घडला होता. यातील एक तक्रारच आरोपी असल्याचे सीसीटीव्हीच्या फूटेजच्या आधारे स्पष्ट झाल्यानंतर विजय जोशी आणि त्याचा साथीदार अनिकेत जाधव यांना नौपाडा पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली.

ठळक मुद्देपूर्व वैमनस्यातून केला गुन्हा अवघ्या २४ तासांत दोघांना अटक सीसीटीव्हीच्या आधारे मिळाला दुवा

ठाणे : दीड वर्षांपूर्वी चोरीचा आळ घेऊन तक्रार दाखल केल्याच्या रागातून विजय जोशी (२२) याने आणि त्याचा साथीदार अनिकेत जाधव (१९) या दोघांनी गणेशवाडीत वाहनांना आगी लावल्याचे उघड झाले आहे. अवघ्या २४ तासांत या प्रकरणाचा छडा लावून नौपाडा पोलिसांनी या दोघांनाही अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.ठाण्यातील पूर्व दू्रतगती मार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील गणेशवाडीमध्ये गुरुवारी पहाटे २ ते ३ वा. च्या सुमारास नऊ मोटारसायकलींना आगी लागल्याने एकच खळबळ उडाली होती. परिस्थितीचे गांर्भीर्य लक्षात घेऊन स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव आणि संजय धुमाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि उपनिरीक्षक शिरीष यादव यांची दोन पथके तयार केली होती. दोन्ही पथकांनी सुमारे ४० ते ५० सीसीटीव्हींच्या फूटेजची पडताळणी केली. रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि काही संशयितांकडेही त्यांनी चौकशी केली. याच दरम्यान, एका सीसीटीव्हीत दोन तरु ण संशयास्पदरित्या आढळले. त्यांनी आणलेल्या कारचा लाईट हा वेगह्या प्रकारचा होता. त्या आधारे त्या गाडीचा शोध घेतल्यानंतर आधी अनिकेतला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सीसीटीव्हीतील ती कारही आढळली. त्याच्याच चौकशीतून विजय जोशीचे नाव समोर आले. जुलै २०१६ मध्ये गणेशवाडीतील एकाने विजयविरुद्ध चोरीचा आरोप करून तक्रार नोंदविली होती. या तक्रारदाराला घटनास्थळी त्यावेळी विजयचे पाकिट मिळाल्याने त्याच्याविरुद्ध ही तक्रार झाली होती.या तक्रारीनंतर परिसरातील लोक त्याला ‘चोर चोर’ असे हिणवून त्याची हेटाळणी करीत होते. प्रत्यक्षात चोरीसाठी तिथे शिरलाच नव्हता, असा त्याचा दावा होता. पण आपल्यावर होत असलेल्या हेटाळणीमुळे तो व्यथित झाला होता. याच रागातून त्याने अनिकेतच्या मदतीने या तक्रारदाराची नविन गाडी जाळण्याचे ठरविले. त्याने ती गाडी पेटविली. पण तिच्यासह इतर आठ अशा नऊ गाड्या यात जळाल्या. विशेष म्हणजे ज्याने या गाड्या पेट्रोल टाकून पेटविल्या, त्याचीही गाडी यात जळाली. त्यामुळे गाडी जळालीची तक्रार देण्यासाठी तोही पुढे आला होता. गुरुवारी जो तक्रारदार होता, तोच विजय यात आरोपी म्हणून निष्पन्न झाल्याचेही पोलीस तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या कौशल्यपूर्ण तपासाबद्दल स्वामी यांनी तपासपथकाचे विशेष कौतुक केले........................

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfireआग