कल्याणमधल्या भीषण आगीत 2 गाड्या जळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2016 07:41 AM2016-10-31T07:41:06+5:302016-10-31T07:41:06+5:30

कल्याण पश्चिमेतील चिकणघर आणि खडकपाडा परिसरात असणाऱ्या गॅरेजला आज रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली.

Two vehicles were set on fire in the fire in Kalyan | कल्याणमधल्या भीषण आगीत 2 गाड्या जळाल्या

कल्याणमधल्या भीषण आगीत 2 गाड्या जळाल्या

Next

ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 31 - कल्याण पश्चिमेतील चिकणघर आणि खडकपाडा परिसरात असणाऱ्या गॅरेजला आज रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गॅरेजसह त्यातील 2 गाड्यांचाही अक्षरशः कोळसा झाला. फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे.

येथील खडकपाडाकडून चिकणघरकडे जाणाऱ्या रस्त्यावर संदीप हॉटलेच्या मागे हे गॅरेज आहे. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात आले. या गॅरेजमध्ये असणाऱ्या ऑइल आणि इतर ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले.

आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत गॅरेज, त्यातील 2 गाड्या (4 व्हीलर) आणि गॅरेजशेजारील पानाची टपरी पूर्ण जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांच्या साहाय्याने ही आग नियंत्रणात आणली गेली.

Web Title: Two vehicles were set on fire in the fire in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.