शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोलीत पाण्याचा गैरवापर

By admin | Updated: October 29, 2015 23:18 IST

कळंबोली शहरातील एलआयजी, केएल १ या भागात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गंभीर समस्या उद्भवत आहे, मात्र या भागात पाणीटंचाईपेक्षा पाण्याचा गैरवापर अधिक असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे.

तळोजा : कळंबोली शहरातील एलआयजी, केएल १ या भागात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गंभीर समस्या उद्भवत आहे, मात्र या भागात पाणीटंचाईपेक्षा पाण्याचा गैरवापर अधिक असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे.एलआयजी, केएल १ या भागात अनधिकृत मजले चढवलेले आहेत. मुळात म्हणजे एका घरामागे एक पाण्याचे कनेक्शन असताना परिसरातील रहिवासी या कनेक्शनला १ एचपी, २ एचपीच्या मोटारी लावून पाणी वापरत आहेत. यामुळे घराच्या वर असलेल्या ३ मजल्यापर्यंत पाणी पुरवणे सोपे होते. गेली कित्येक वर्षे हा प्रकार सुरु असून यामुळे पाण्याचा गैरवापर होत आहे. शिवाय या ठिकाणाप्रमाणे कळंबोलीत काही ठिकाणी पाण्याच्या जोडणीला मीटर नसल्याने सिडकोकडून किरकोळ रुपयात पाणी मिळायचे. मात्र आता उशिरा का होईना प्रशासनाला शहाणपण सुचलेले आहे. या प्रकरणी सिडकोचे संजय भाटिया यांच्याकडे कळंबोली शहरातील या भागांचा लेखाजोखा पाणीपुरवठा विभागाने मांडला असून यावर लवकरच अंमलबजावणी होणार आहे. कळंबोली परिसरातील एलआयजी, केएल १, केएल २ या भागात सुमारे ६५ हजार लोकवस्ती असून यातील एलआयजी, केएल १ या भागात अनधिकृत मजले चढवलेले आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारमुळे मजले दिवसेंदिवस चढत आहेत, त्यामुळे या परिसरात सिडकोला गरजेपेक्षा अधिक पाणी द्यावे लागत आहे. त्या शिवाय पाणी ओढण्यासाठी मोटारीची स्पर्धा येथे लागत आहे. सिडकोच्या जलवाहिनीतला दाब कमी असल्याने या लोकांना त्याची गरज लागत आहे, मात्र आता या परिसराला मुबलक पाणी पुरवण्यासाठी योग्य उपाययोजना केली जाणार असून पाणीप्रश्न मार्गी लागेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)