शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१९९ चेंडूंत ६५२ धावांचे तुफान!

By admin | Updated: January 5, 2016 03:23 IST

मैदानात चौकार-षटकारांची अक्षरश: आतशबाजी सुरू आहे... जल्लोष क्षणभरही थांबत नाही... बघता-बघता १९९ चेंडूंत नाबाद ६५२ धावांची विश्वविक्रमी खेळी साकारली जाते

कल्याण : मैदानात चौकार-षटकारांची अक्षरश: आतशबाजी सुरू आहे... जल्लोष क्षणभरही थांबत नाही... बघता-बघता १९९ चेंडूंत नाबाद ६५२ धावांची विश्वविक्रमी खेळी साकारली जाते... ख्रिसगेलसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कोणत्याही तडाखेबाज खेळाडूचे हे तुफान नसून, दहावीत शिकत असलेल्या कल्याणच्या १६वर्षीय प्रणव धनावडे नावाच्या वादळाने हा विक्रम प्रस्थापित केला आहे. कल्याणमधील वायलेनगर परिसरातील युनियन क्रि केट अ‍ॅकॅडमीच्या ग्राउंडवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आंतरशालेय एच.टी. भंडारी क्रिकेट कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रणवच्या धुवाधार फलंदाजीने यापूर्वी १८९९ साली इंग्लंडच्या आर्थर कॉलिन्स याने केलेल्या ६२८ धावांचा विक्रम मोडला गेला. रिझवी स्प्रिंगफील्डच्या पृथ्वी शॉ याने २०१४ साली मुंबईतील स्पर्धेत ५४६ धावांचा विक्रम केला होता. तो विक्रमही प्रणवने मागे टाकला. कल्याणच्या के.सी. गांधी शाळेत १०वीत शिकत असलेला प्रणव ५ तास मैदानावर तळ ठोकून होता. तो नाबाद असून, पहिल्या दिवसअखेर त्याच्या संघाने प्रणवसह आकाश सिंग (१७३) आणि सिद्धेश पाटील (नाबाद १००) यांच्या खेळीच्या जोरावर १ बाद ९५६ धावांचा एव्हरेस्ट उभारला आहे.