ठाण्यात इमारतीतील घराचा स्लॅब पडल्याने 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, 3 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 11:26 AM2017-11-24T11:26:24+5:302017-11-24T11:26:58+5:30

किसन नगर भागातील विजय निवास या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील घरात स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे.

60-year-old man dies and 3 others injured in slab collapse in Thane building | ठाण्यात इमारतीतील घराचा स्लॅब पडल्याने 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, 3 जण जखमी

ठाण्यात इमारतीतील घराचा स्लॅब पडल्याने 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, 3 जण जखमी

Next

 ठाणे - किसन नगर भागातील विजय निवास या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील घरात स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात घरातील बबलू घोष (60) यां व्यक्तीच्या डोक्यावर स्लॅब पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर बानी बबलू घोष (५६) ही महिला गंभीर जखमी झाली असून त्यांना ठाण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तसंच नयना पठारे (५१), यास्मिन रजनीकांत पठारे (22) या महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.

गुरूवारी रात्री 12.30 च्या सुमारास ही घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ति विभाग आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ठाण्यातील ही इमारत 5 मजली इमारत असून आता पालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिट टीमकडून इमरतीची पाहणी करण्यात येत आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर इमरतीच्या बाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

Web Title: 60-year-old man dies and 3 others injured in slab collapse in Thane building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.