शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या मार्गात येणारे ३३३ पथदिवे हटविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 00:19 IST

चार कोटी सहा लाख ३८ हजारांचा खर्च : ठामपाच्या स्थायी समितीने दिली मान्यता

ठाणे : वडाळा ते कासारवडवली मेट्रो प्रकल्पाच्या ठाण्यातील कामात ३३३ पथदिवे बाधित होणार आहेत. ते नऊ मीटर उंचीचे असून आता त्याऐवजी महापालिका येथे इतर ठिकाणी चार कोटी सहा लाख ३८ हजार ७८६ रुपये खर्चून सात मीटर उंचीचे ६०९ पथदिवे उभारणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या बैठकीत स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यातही या ठिकाणी असलेल्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीमुळे पथदिव्यांची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मेट्रोच्या मार्गातील आणखी एक अडथळा दूर झाला आहे.

ठाण्यात सध्या तीनहातनाका ते कासारवडवली या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. कोरोनामुळे त्याची गती मंदावली होती. परंतु, आता पुन्हा त्याला सुरुवात झाली आहे. मेट्रो प्रकल्पाची मार्गिका ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्ग आणि मुंबई-अहमदाबाद महामार्ग याठिकाणाहून जाणार आहे. त्यासाठी या दोन्ही महामार्गांवर मेट्रोचे खांबउभारणीचे काम सुरू असून त्यावर आता गर्डर बसविण्यात येणार आहेत. यापूर्वी यात अडसर ठरणारे वृक्ष तोडले आहेत. त्यापाठोपाठ आता बाधित होणारे पथदिवेदेखील हटविण्याचा निर्णय घेऊन यासंबंधीच्या कामाची अंतिम निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. त्यामध्ये जुने पथदिवे हटवून त्याजागी नवीन पथदिवे बसविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या मेट्रो मार्गाजवळील २२ केव्ही उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीमुळे नऊ मीटर उंचीचे खांब सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उभे करणे शक्य नसल्यामुळे सात मीटर उंचीचे चार पथदिवे लावून पुरेसा प्रकाश पडतो का, याची खात्री केली. त्यानुसार, ते बसविण्याचा निर्णय घेतला. यामुळे पथदिव्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे प्रस्तावात नमूद आहे.एक पथदिवा ६६ हजार ७३० रुपयांनातीनहातनाका ते कासारवडवली याठिकाणी हे ३३३ पथदिवे असून त्याठिकाणी आता एकूण ६०९ पथदिवे बसविण्यात येणार आहेत. तीन टप्प्यांत ही कामे विभागली होती. त्यानुसार, तीनहातनाका ते कापूरबावडी जंक्शन या पहिल्या टप्प्यातील कामासाठी एक कोटी १२ लाख ५७ हजार, कापूरबावडी ते कासारवडवली या दुसºया टप्प्यातील कामासाठी दोन कोटी ८७ लाख २२ हजार आणि कॅडबरी जंक्शन ते तीनहातनाका येथील हायमास्ट स्थलांतरित करण्यासाठी सहा लाख ५९ हजार ७८६ रुपयांच्या लघुत्तम निविदांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेMetroमेट्रो