शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावात विकास नियंत्रण नियमावली समान हवी

By admin | Updated: January 26, 2016 01:55 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेत २७ गावे समाविष्ट असली तरी त्यांचा विकास आराखडा हा एमएमआरडीएने तयार केला आहे. २७ गावे व महापालिका यांची विकास नियंत्रण नियमावली

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत २७ गावे समाविष्ट असली तरी त्यांचा विकास आराखडा हा एमएमआरडीएने तयार केला आहे. २७ गावे व महापालिका यांची विकास नियंत्रण नियमावली समान असावी अशी मागणी कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी एमएमआरडीएकडे केली आहे. विकास प्राधिकरणाचा दर्जा आजही एमएमआरडीएकडे असल्याने नवी बांधकामे व एफएसआयविषयी धोरण ठरत नाही. त्याचा फटका विकास कामाला होत आहे हा मुद्दा आमदार भोईर यांनी मांडला आहे. महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांसाठी एमएमआरडीएने तयार केलेल्या मंजूर विकास आराखड्यात भाल व भोपर येथील जागेवर डंपिंग ग्राऊंड प्रस्तावित आहेत. हा डंपिंग ग्राऊंड त्याठिकाणी करण्यात येऊ नये. त्याला आमदार म्हणून कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी विरोध केला आहे. तशी मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भोईर यांनी केल्याने त्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकारयांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आमदार भोईर यांनी दिली आहे. एमएमआरडीएने २७ गावांसाठी तयार केलेला आराखड्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३० डिसेंबर २०१४ रोजी मान्यता दिली. या आराखड्यात भाल येथे २५० एकर जागेवर डंपिंगसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. तर भोपर येथे ९० एकर जागेवर आरक्षण टाकण्यात आले आहे. यापूर्वी राज्य सरकारने औद्योगिक विकास महामंडळ,ब्रिटीशांनी नेवाळी विमान तळासाठी जागा घेतली. तेव्हाही भाल गावचा शेतकरी बाधित झाला होतो. आत्ता २५० एकर जागा डंपिंग ग्राऊंडसाठी घेतल्यास त्याच्यावर आणखीन अन्याय होणार असल्याचा मुद्दा भोईर यांनी विशद केला आहे. २७ गावे महापालिकेत समाविष्ट केल्यानंतर नुकत्याच २७ गावांसह महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. डंपिंग ग्राऊंडचे आरक्षण हटविण्याच्या मागणीसाठी भाल गावच्या नागरीकांनी मतदानावर १०० टक्के बहिष्कार टाकला होता. निवडणूक प्रचारादरम्यान २७ गावांची संघर्ष सभा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थिीत पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरक्षण बदल्याबाबत नक्कीच विचार केला जाईल असे आश्वासन दिले होते असे नागरीकांकडून सांगण्यात आले.