शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अजब कारभार! काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 21:06 IST

कोणतंही काम न करता शिक्षकांना २ महिन्यांचं वेतन

- उमेश जाधवटिटवाळा: ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने कल्याण तालुक्यातील ऑनलाइन बदली झालेल्या २२ शिक्षकांना त्यांच्या बदलीच्या शाळेत हजर न राहता आणि कुठेही काम न करता जून आणि जुलै महिन्याचे वेतन दिले आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून २२ शिक्षकांना दिलेली २५ लाखांहून अधिक रक्कम वसूल करावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे कल्याण लोकसभाप्रमुख धनंजय जोगदंड यांनी केली आहे. तसेच तक्रारींचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहेत.ठाणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभाग भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाली आहे. नियमानुसार ऑनलाइन पद्धतीने बदली झालेल्या कल्याण तालुक्यातील २२ शिक्षक बदली झालेल्या शाळेत हजर झाले नाहीत.  हे सर्व शिक्षक कल्याण तालुक्यातील होते. ते बदली झालेल्या शाळेत हजर न होता उच्च न्यायालयात गेले. याच तालुक्यातील अन्य दोनशेहून अधिक शिक्षक आपल्या बदलीच्या शाळेत हजर झाले आहेत. मात्र त्यांना अद्याप मे महिन्याचे वेतन मिळालेले नाही. न्यायालयात गेलेल्या शिक्षकांच्या बाबतीत प्राथमिक शिक्षण विभागाने उच्च न्यायालयाला माहिती देताना वास्तव लपवून ठेवले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात  सादर केल्यामुळे २२ शिक्षकांनी प्राथमिक शिक्षण विभागाची कोंडी करून आपला स्वार्थ साधला आणि कोणतेही काम न करता चक्क दोन महिन्याचे वेतन आणि १ जुलैची वेतनवाढ घेऊन ३ ऑगस्टला स्वतंत्र समुपदेशनात पुन्हा सोयीच्या शाळांत बदली करून घेतली आहे.या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची खाते निहाय चौकशी करून त्यांच्यासह कल्याण तालुक्यातील तत्कालीन गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून ही २५ लाखांहून अधिक रक्कम वसूल करावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केल्यामुळे जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग पुन्हा चर्चेत आला आहे. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे अशी माहिती शिक्षण विभागाने दिली. मात्र प्राथमिक शिक्षण आधिकऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

टॅग्स :Teacherशिक्षक