शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१७ हजार रुपयांची रोकड केली परत!

By admin | Updated: December 26, 2016 07:19 IST

रस्त्यात गहाळ झालेली १७ हजार रुपयांची बॅग मनीष शहा (रा. देसलेपाडा) यांना ट्रॅफिक वॉर्डन निलेश भोईटे यांच्या प्रामाणिकपणामुळे

डोंबिवली : रस्त्यात गहाळ झालेली १७ हजार रुपयांची बॅग मनीष शहा (रा. देसलेपाडा) यांना ट्रॅफिक वॉर्डन निलेश भोईटे यांच्या प्रामाणिकपणामुळे परत मिळाली आहे. शहा यांनी हे पैसे त्यांच्या पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जमवले होते. दरम्यान, भोईटे यांच्या या सच्चाईमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.शहा बुधवारी सायंकाळी १७ हजारांची बॅग घेऊन जात होते. मात्र, कौटुंबिक तणावामुळे ही बॅग त्यांच्याकडून गहाळ झाली. ती बॅग चाररस्त्यानजीक तेथे कर्तव्यावर असलेल्या भोईटे यांनी सापडली. ही बाब त्यांनी तातडीने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार, वाहतूक पोलीस ठाण्यात ती बॅग आणली असता त्यात काही कागदपत्रे आणि दोन हजार रुपयांच्या चार नोटा तसेच अन्य १०० रुपयांचे बंडल असे एकूण १७ हजार रुपये आढळले. भोईटे यांच्यासह पोलीस निरीक्षक मुरलीधर नाईकनवरे, प्रभारी अधिकारी गोविंद गंभीरे आदींनी कागदपत्रांची पाहणी केली. त्यात सापडलेल्या मोबाइल क्रमांकावर त्यांनी कॉल केला. तो फोन शहा यांच्या पत्नीकडे होता. पोलिसांनी घडलेली हकीकत त्यांना सांगितली. त्यानुसार, शहा यांनी वाहतूक पोलीस ठाण्याशी गुरुवारी संपर्क साधला. कागदपत्रे व १७ हजारांंच्या नोटांचे वर्णन पटल्यानंतर गंभीरे, नाईकनवरे यांनी शहा यांना त्यांची बॅग परत केली. वाहतूक पोलिसांच्या या प्रामाणिकपणाबद्दल शहा यांनी समाधान व्यक्त केले. अजूनही माणुसकी शिल्लक असल्याची भावना शहा दाम्पत्याने व्यक्त केली. (प्रतिनिधी)