शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात येणार बॅटरीवरील १०० बसेस

By admin | Updated: October 1, 2015 23:38 IST

क्लस्टरसारख्या योजनांबरोबर लवकर ठाण्यात बॅटरीवरील १०० बसेस येणार असल्याची घोषणा करताना ठाणेकरांसाठी भविष्यातही लोकोपयोगी उपक्रम महापालिका हाती घेईल

ठाणे : क्लस्टरसारख्या योजनांबरोबर लवकर ठाण्यात बॅटरीवरील १०० बसेस येणार असल्याची घोषणा करताना ठाणेकरांसाठी भविष्यातही लोकोपयोगी उपक्रम महापालिका हाती घेईल, अशी माहिती ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी गुरुवारी ठाणे महानगरपालिकेच्या ३३ व्या वर्धापन दिन सोहळ्यात राम गणेश गडकरी रंगायतन येथे बोलताना दिली.या वेळी ठाणे शहराच्या विकासाबरोबरच समाजासाठी योगदान देणाऱ्या ठाणेकरांना ठाणे-भूषण, ठाणे-गौरव आणि ठाणे-गुणीजन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, उपमहापौर राजेंद्र साप्ते, स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, सभागृह नेत्या अनिता गौरी आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी २०१४ आणि २०१५ या दोन्ही सालांमधील ठाणे-भूषण, ठाणे-गौरव आणि ठाणे-गुणीजन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये मान्यवरांच्या हस्ते डॉ. वि. जोशी / डॉ. स्मिता जोशी, कृष्णकुमार कोळी, वसंत मराठे, मोहन गंधे, वसंत मोरे, अ‍ॅड. सदानंद भिसे, अनिल कुलकर्णी, लक्ष्मण मुर्डेश्वर, व्ही.के. वानखेडे सर, सुरेंद्र दिघे, अ‍ॅड. बाबा चिटणीस, श्रीमती बर्नेडेट पिमेंटा, अ‍ॅड. राम आपटे, रवी पटवर्धन, नारायण तांबे आणि मनोहर साळुंखे यांचा ठाणे-भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभानंतर सायंकाळी रूतबा या सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले.सकाळी महापालिका मुख्यालय येथे महापौर संजय मोरे यांच्या हस्ते आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) अशोककुमार रणखांब यांच्या उपस्थितीत महापालिका ध्वजाचे ध्वजारोहण केले. या वेळी उपमहापौर राजेंद्र साप्ते, विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, क्र ीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती संभाजी पंडित, नौपाडा प्रभाग समिती अध्यक्ष हिराकांत फर्डे, काँग्रेस गटनेते संजय घाडीगावकर, अतिरिक्त आयुक्त (१) सुनील चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.