शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 06:13 IST

French Open 2025: अमेरिकेच्या द्वितीय मानांकित कोको गाॅफने शानदार कामगिरी करताना शनिवारी अंतिम लढतीत बेलारूसच्या अग्रमानांकित आर्यना सबालेंका हिच्यावर रोमांचक विजय मिळवताना फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.

पॅरिस - अमेरिकेच्या द्वितीय मानांकित कोको गाॅफने शानदार कामगिरी करताना शनिवारी अंतिम लढतीत बेलारूसच्या अग्रमानांकित आर्यना सबालेंका हिच्यावर रोमांचक विजय मिळवताना फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. गाॅफचे हे एकेरीतील पहिलेच फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. २०२४मध्ये तिने फ्रेंच ओपनमध्ये दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. याआधी गाॅफने २०२३मध्ये अमेरिकन ओपनच्या अंतिम लढतीत एका सेटच्या पिछाडीवरून सबालेंकालाच पराभूत करत विजेतेपद पटकावले होते.

कोको गाॅफने दोन तास ३८ मिनिटे रंगलेल्या रोमांचक लढतीत सबालेंकावर ६-७ (५-७), ६-२, ६-४ असा शानदार विजय मिळवला. टायब्रेकरमध्ये पहिला सेट गमावल्यानंतर गाॅफने दमदार पुनरागमन करताना संस्मरणीय विजय साकारला. २०१३ नंतर पहिल्यांदाच पॅरिसमध्ये अग्रमानांकित आणि द्वितीय मानांकित यांच्यात अंतिम सामना रंगला. २०१३मध्ये सेरेना विलियम्सने मारिया शारापोव्हाला पराभूत केले होते. गेल्या ३० वर्षांत हा पहिल्या दोन खेळाडूंमधील केवळ दुसरा सामना ठरला. गॉफच्या दुसऱ्या मॅच पॉइंटवर सबालेंकाने बॅकहँड वाइड पाठवल्यानंतर २१ वर्षीय गाॅफ पाठीवर पडून दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेत तिने जल्लोष केला. सबालेंकाने गाॅफचे अभिनंदन केल्यानंतर तिने फिल्म डायरेक्टर स्पाइक ली यांची गळाभेट घेत सहकाऱ्यांसह आनंद साजरा केला. सबालेंकाने निर्णायक सेटमध्ये आक्रमक सुरुवात केली. पहिला सर्व्हिस गेम राखण्यासाठी तिने जोखीम घेतली. तिसऱ्या सेटमध्ये गॉफने खेळ उंचावताना उत्कृष्ट रॅली जिंकली.

तिसऱ्या सेटमध्ये गाॅफने राखले सातत्य
गॉफने बेसलाइनपासून सातत्य राखले आणि ब्रेक पॉइंट मिळवला, जो तिने सबालेंकाच्या दुहेरी चुकीवर रूपांतरित केला. ज्यामुळे गाॅफला २-१ अशी आघाडी मिळाली. सबालेंकाने निराशा व्यक्त केली पण त्यानंतर तिने सामना ३-३ असा बरोबरीत आणला. गॉफने दोनदा सबालेंकाची सर्व्हिस ब्रेक करत वर्चस्व गाजविले.

चाहत्यांच्या प्रेमामुळेच जिंकले : गाॅफ 
गाॅफ म्हणाली की, आज या गर्दीने मला खरोखर मदत केली. तुम्ही मला प्रोत्साहन देत होता आणि त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित झाला. त्यामुळेच मी आज येथे जिंकू शकले.

 

टॅग्स :Tennisटेनिस