शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : जाेकाेविच, सबालेंका उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 05:58 IST

Australian Open Tennis: जागतिक क्रमवारीतील बेलारूसची अव्वल टेनिसपटू आर्यना सबालेंका हिने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद पटकावण्याच्या दिशेने भक्कम वाटचाल करताना दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली.

मेलबोर्न : जागतिक क्रमवारीतील बेलारूसची अव्वल टेनिसपटू आर्यना सबालेंका हिने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद पटकावण्याच्या दिशेने भक्कम वाटचाल करताना दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर पुरुष गटात नोव्हाक जोकोविच, कार्लोस अल्काराझ आणि अलेक्झांडर ज्वेरेव यांनीही अंतिम आठमधील स्थान निश्चित केले. 

दहावेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या जोकोविचने २४व्या स्थानावरील जिरी लेहेस्का याला ६-३, ६-४, ७-६ असे पराभूत केले. जॅक ड्रेपर याने दुखापतीमुळे माघार घेतल्याने अल्काराझने आगेकूच केली. पुरुष गटात द्वितीय मानांकित ज्वेरेवने चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने उगो हम्बर्ट याला ६-१, २-६, ६-३, ६-२ असे पराभूत केले. विक्रमी २४ ग्रँडस्लॅम जिंकणारा जोकोविच आणि तृतीय मानांकित अल्काराझ यांनीही आगेकूच केली. उपांत्यपूर्व फेरीत दोघेही आमने-सामने असतील.

सबालेंकाने रशियाच्या १४व्या मानांकित मीरा अँड्रेवा हिचा पराभव केला. रॉड लेवर अरेनामध्ये झालेल्या सामन्यात जबरदस्त आक्रमक खेळ करताना सबालेंकाने अँड्रेवाचा ६-१, ६-२ असा सहज पराभव केला. सबालेंकाच्या वेगवान खेळापुढे अँड्रेवाला आपला खेळ सादरच करता आला नाही. यासह सबालेंकाने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील आपला सलग १८ वा विजयही नोंदवला. याआधी, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मार्टिना हिंगीसने सलग तीनवेळा जेतेपद पटकावले होते. तिने १९९७-१९९९ दरम्यान हा पराक्रम केला होता.

बोपन्ना-शुआई यांची आगेकूच
मिश्र दुहेरी गटात भारताच्या रोहन बोपन्नाने चीनच्या झांग शुआईसह खेळताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यांना दुसऱ्या फेरीत चाल मिळाली. बोपन्ना-शुआई यांचा सामना टेलर टाउनसेंड (अमेरिका) आणि ह्यूगो निस (मोनाको) यांच्याविरुद्ध होता. मात्र, ही जोडी कोर्टवर उतरलीच नाही आणि बोपन्ना-शुआई यांचा पुढील फेरीत प्रवेश झाला. बोपन्ना-शुआई यांनी ख्रिस्टिना म्लादेनोविच (फ्रान्स) आणि इवान डोडिक (क्रोएशिया) यांचा ६-४, ६-४ असा पराभव करत आपल्या मोहिमेला सुरुवात केली होती.

 


 

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपनNovak Djokovicनोव्हाक जोकोव्हिच