शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Australian Open 2026: जिद्दी अल्काराझची झुंजार खेळी; रोमहर्षक सेमीफायनल जिंकत गाठली फायनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:10 IST

पहिल्या दोन सेटमध्ये आक्रमक खेळीसह अपेक्षित सामन्यात आघाडी घेतल्यावर मागे पडला, पण...

Australian Open 2026 : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये स्पेनचा युवा कार्लोस अल्काराज आणि अनुभवी जर्मन स्टार अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यात काँंटे की टक्कर पाहायला मिळाली. टेनिस जगतातील अव्वल मानांकित  कार्लोस अल्काराझ याने थरारक आणि ऐतिहासिक पुनरागमन करत अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव केला. तब्बल ५ तास २७ मिनिटे चाललेल्या या मॅरेथॉन लढतीत अल्कराजने ६-४, ७-६(५), ६-७(३), ६-७(४), ७-५ असा विजय मिळवत फायनल गाठली. 

क्रॅम्प्स आणि दुखापतीवर मात करत जिंकला हातून निसटतोय असे वाटणारा सामना

या सामन्यात अल्काराझला तीव्र क्रॅम्प्स आणि दुखापतीचा सामना करावा लागला. सामन्यादरम्यान त्याने उपचार घेतले, इतकेच नव्हे तर पिकल ज्यूसचीही मागणी केली होती. जवळपास साडे पाच तास चाललेल्या  लढतीत जाणवणारा शारीरिक थकवा आणि वेदना सहन करत सामना हातून निसटतोय असे वाटत असताना  अफलातून जिद्दीनं खेळत त्याने आपलं अधिराज्य कायम राखलं. 

Australian Open : "उह-आया…" आवाजावर आक्षेप! पंचांच्या निर्णयामुळे सेमीफायनलमध्ये हायहोल्टेज ड्रामा

फायनलमध्ये कुणाशी होणार लढत?

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये यानिक सिन्नप (सलग दोन वेळा विजेता) आणि नोवाक जोकोविच (मेलबर्नचा १० वेळचा बादशहा) यांच्यात रंगणार आहे. या दोघांमधील विजेता फायनलमध्ये अल्कराजला भिडेल. अवघ्या २२ व्या वर्षी अल्काराझ करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण करणारा इतिहासातील सर्वात तरुण पुरुष टेनिसपटू ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील जेतेपदासह तो महान टेनिसपटू राफेल नदाललाही मागे टाकू शकतो. यंदाच्या वर्षातील पहिल्या वहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत तो हा इतिहास रचणार का? ते पाहण्याजोगे असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Alcaraz's Tenacious Fight: Reaches Australian Open 2026 Final!

Web Summary : Carlos Alcaraz secured a spot in the Australian Open 2026 final after a grueling 5-hour, 27-minute semi-final match against Alexander Zverev. Despite cramps and injuries, Alcaraz showed incredible resilience, winning 6-4, 7-6(5), 6-7(3), 6-7(4), 7-5.
टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपनTennisटेनिस