व्हाट्सअॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:55 IST2025-08-07T12:54:22+5:302025-08-07T12:55:01+5:30
WhatsApp Safety Tools: फ्रॉडची सुरुवात एका टेक्स्ट मेसेजने होते. लिंक येते, लुभावणाऱ्या ऑफर्स असतात, पैसे डबल, ट्रिपल आदी करण्याचे सांगितले जाते. हे फ्रॉड आहे हे ओळखणे खूप कठीण असते.

व्हाट्सअॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
व्हाट्सअॅपचे नवीन 'सेफ्टी ओव्हरव्यू' टूल लाँच केले आहेत. युजरना मेसेज करताना घोटाळे ओळखण्यासाठी याची मदत मिळणार आहे. व्हॉट्सअपने आधीच ६.८ दशलक्ष व्हाट्सअॅप अकाऊंट बंद केली आहेत. तरीही गुन्हे वाढतच चालले आहेत. घोटाळेबाज झटपट पैसे कमावण्यासाठी आकर्षक वाटणार्या परंतु सत्यात अविश्वसनीय ऑफर आणि पिरॅमिड स्कीमद्वारे लोकांची फसवणूक करत आहेत, या फ्रॉडपासून वाचण्यासाठी व्हॉट्सअपने हे पाऊल उचलले आहे.
या फ्रॉडची सुरुवात एका टेक्स्ट मेसेजने होते. लिंक येते, लुभावणाऱ्या ऑफर्स असतात, पैसे डबल, ट्रिपल आदी करण्याचे सांगितले जाते. हे फ्रॉड आहे हे ओळखणे खूप कठीण असते. यासाठी पहिले फिचर हे ग्रुप मेसेजिंगवर आले आहे. तुमच्या संपर्कात नसलेल्या व्यक्तीने तुम्ही कदाचित ओळखत नसलेल्या नवीन व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये तुम्हाला घेतले असेल तर तुम्ही त्याच्या रिव्हू करू शकता. तुम्हाला वाटल्यास त्या ग्रुपवरील चॅट पाहता येतील, तुम्ही जोवर तो ग्रुप तुमच्यासाठी योग्य आहे हे कळवत नाही तोवर त्या ग्रुपमधील मेसेज सायलेंट केले जाणार आहेत. तुम्ही रिव्ह्यू करताना तो ग्रुप सोडूही शकता.
वैयक्तिक मेसेंजिंगमध्ये तुम्ही मेसेज करण्यापूर्वी त्याची माहिती इंटरनेटवर घेऊ शकता. व्हॉट्सअप तुम्हाला या व्यक्तीबाबत आणखी काही संदर्भ देऊन तुम्हाला सावध करणार आहे. जेणेकरून तुम्ही त्या व्यक्तीसोबत बोलायचे की नाही हे ठरवू शकता. ती व्यक्ती जर कोणाची ओळख सांगत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही फोन करू शकता व याची माहिती घेऊ शकता. अशाप्रकारच्या सावधगिरीच्या टिप्स तुम्हाला दिल्या जाणार आहेत.