शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

अलर्ट! चीनचा व्हायरस अटॅक, 15 लाख भारतीयांचा डेटा चोरीला; व्हा सावध, 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 12:55 IST

गुगल प्ले स्टोअरवर असे दोन नवीन स्पायवेअर्स आढळून आले आहेत जे लाखो भारतीय युजर्सचा डेटा चोरून चीनला पाठवत आहेत.

भारतात सायबर गुन्हेगार वेगाने आपले हात-पाय पसरत आहेत. दररोज नवीन मालवेअर किंवा स्पायवेअर सुरक्षेत अडथळा आणत आहेत. गुगल प्ले स्टोअरवर असे दोन नवीन स्पायवेअर्स आढळून आले आहेत जे लाखो भारतीय युजर्सचा डेटा चोरून चीनला पाठवत आहेत. ज्या Apps मध्ये हे स्पायवेअर आहेत ते युजर्सना व्हायरसने प्रभावित झाल्याचं कळू देत नाहीत. हे दोन Apps File Recovery and Data Recoveryआणि File Manager आहेत आणि त्यांचे एकत्रितपणे 15 लाख युजर्स आहेत.

Pradeo नावाच्या मोबाईल सायबर सिक्योरिटी कंपनीने खुलासा केला आहे की, Google Play Store वर असे दोन Apps आहेत जे स्वतःला फाइल मॅनेजमेंट टूल्स म्हणून दाखवतात. पण युजर्सचा संवेदनशील डेटा चोरून तो चीनला पाठवला जात आहे. हे App लाखो लोकांनी डाऊनलोड केलं आहे आणि युजर्स देखील त्यांचा वापर करत आहेत.

File Recovery and Data Recovery युजर्सचा डेटा चोरत आहेत. त्यांचे अनुक्रमे 10 लाखांहून अधिक युजर्स आणि 5 लाख डाउनलोड आहेत. तसेच हे Apps दावा करतात की, ते कोणत्याही प्रकारचा डेटा चोरत नाहीत. Pradeo च्या अहवालानुसार, हे Apps युजर्सचा वैयक्तिक डेटा जसे की रिअल टाइम तपशील, सोशल नेटवर्क्स, ईमेल, संपर्क इत्यादी चोरतात. हे Apps हा डेटा चिनी सर्व्हरला पाठवत आहेत.

'या' गोष्टी लक्षात ठेवा

- कोणत्याही थर्ड पार्टी App वरून कोणतेही App डाउनलोड करू नका.
- कोणतेही App डाउनलोड करण्यापूर्वी, त्याचा रिव्ह्यू वाचा. 
- तुम्हाला काही चुकीचे आढळल्यास ते App डाउनलोड करू नका.
- जर एखाद्या App ने तुम्हाला परवानगी मागितली तर तुम्ही फक्त त्याच परवानग्या द्याव्या ज्या आवश्यक आहेत.
- तुमच्या डिव्हाइसवर नेहमी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर असावे.
- फोनमध्ये येणाऱ्या सर्व सॉफ्टवेअर अपडेट्ससह फोन अपडेट ठेवा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतcyber crimeसायबर क्राइमtechnologyतंत्रज्ञान