Threads ने ChatGPT टाकले मागे, अवघ्या 5 दिवसात 'इतक्या' लोकांनी केले डाउनलोड!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 10:06 AM2023-07-11T10:06:19+5:302023-07-11T10:20:44+5:30

थ्रेड्सला 6 जुलै 2023 रोजी 1 बिलियन युजर्ससह Public Conversation App बनण्याच्या उद्देशाने लाँच करण्यात आले होते.

Threads overtakes ChatGPT, Instagram Threads cross 100 million downloaded score | Threads ने ChatGPT टाकले मागे, अवघ्या 5 दिवसात 'इतक्या' लोकांनी केले डाउनलोड!

Threads ने ChatGPT टाकले मागे, अवघ्या 5 दिवसात 'इतक्या' लोकांनी केले डाउनलोड!

googlenewsNext

मेटा कंपनीच्या इंस्टाग्रामने ट्विटरला टक्कर देण्यासाठी थ्रेड्स (Threads) हे अ‍ॅप लाँच केले आहे. थ्रेड्स लाँच झाल्यापासून अवघ्या 5 दिवसात 100 मिलियन युजर्सचा टप्पा पार झाला आहे. थ्रेड्सने फास्टेस्ट कंझ्युमर प्रोडक्ट चॅटजीपीटी (ChatGPT) ला देखील मागे टाकले आहे. 

थ्रेड्सला 6 जुलै 2023 रोजी 1 बिलियन युजर्ससह Public Conversation App बनण्याच्या उद्देशाने लाँच करण्यात आले होते. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी थ्रेड्सवरील पोस्टमध्ये जाहीर केले की, लाँच झाल्यापासून अवघ्या 5 दिवसात 100 मिलियन युजर्सपर्यंत पोहोचले आहे. तसेच, सोशल मीडिया थ्रेड्स अ‍ॅपची मागणी बहुतेक ऑर्गेनिक आहे, तर सध्या त्याचे अनेक प्रमोशन कार्यक्रम सुरूही झालेले नाहीत, असेही मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले.
 
OpenAI चे जनरेटिव्ह AI-आधारित चॅटबॉट, चॅटजीपीटी लाँच झाल्यानंतर 40 दिवसांत 10 मिलियन डेली युजर्स आणि लाँच झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांत 100 मिलियन डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्सपर्यंत पोहोचले होते. तेव्हा चॅटजीपीटी हे इंस्टाग्राम, टिकटॉक आणि इतर सोशल मीडियातील दिग्गज अ‍ॅप्सना मोठ्या फरकाने मागे टाकत 100 मिलियन डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्सपर्यंत पोहोचणारे फास्टेस्ट कंझ्युमर प्रोडक्ट बनले होते.

ट्विटरच्या सुद्धा ट्रॅफिकमध्ये घट!
या व्यतिरिक्त, रिपोर्टनुसार जुलै 2022 पर्यंत ट्विटरचे एकूण 240 मिलिनय डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्स होते. मात्र, वेब अ‍ॅनालिटिक्स फर्म SimilarWeb नुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत थ्रेड्स लाँच झाल्यापासून ट्विटरच्या वेब ट्रॅफिकमध्ये 11 टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ट्विटरची मालकी इलॉन मस्क यांच्याकडे आली. यानंतर सोशल मीडियावर ट्विटरऐवजी अनेक पर्याय युजर्स समोर आले आहेत. मात्र, यापैकी कोणताही पर्याय थ्रेड्सइतका यशस्वी झाला नाही.

जाणून घ्या फीचर्स...
थ्रेड्स हे इंस्टाग्रामचे एक नवीन अ‍ॅप आहे, जे युजर्सना टेक्स्ट, लिंक शेअर करण्याची आणि इतर युजर्सच्या मेसेजना उत्तर देऊन किंवा पुन्हा पोस्ट करून कन्व्हर्सेशनमध्ये सामील होण्याची कॅपॅबिलिटी देते. अ‍ॅप युजर्सना आपल्या सध्याच्या इंस्टाग्राम अकाउंट युजर्सच्या नावाने लॉग-इन करण्याची आणि आपल्या फॉलोअर्सच्या लिस्टला फॉलो करण्याची परवानगी देते. म्हणजेच, यासाठी तुम्हाला वेगळे युजर्सचे नाव सेट करण्याची गरज नाही. दरम्यान, मेटा हे लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा युजर्स बेस 2 बिलियनपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये टॉप ब्रँड, प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि कंटेंट क्रिएटर्स सामील आहेत.

Threads कसे करावे इंस्टॉल?
- सर्वात आधी Google Play Store वर जा आणि "Thread, an Instagram app" टाइप करा आणि अ‍ॅप इंस्टॉल करा.
- यानंतर Login with Instagram चा ऑप्शन मिळेल. यानंतर तुमच्या WhatsApp वर लॉगिन कोड येईल, तो याठिकाणी भरा.
- हे केल्यानंतर, "Import from Instagram" वर क्लिक करा. यानंतर ते इंस्टावरून तुमच्या प्रोफाइलमध्ये अ‍ॅक्सेस करेल.
- स्क्रीनच्या खाली दिसत असलेल्या Continue च्या ऑप्शनवर क्लिक करा.
- अटी आणि नियम वाचून Continue करा. यानंतर फॉलो सेम अकाउंट्स (ज्याला तुम्ही इन्स्टाग्रामवर फॉलो करता) वर क्लिक करा.
- आता "Join Threads" वर क्लिक करा. अ‍ॅपल युजर्स देखील हीच प्रक्रिया फॉलो करून अ‍ॅप वापरू शकतात.

Web Title: Threads overtakes ChatGPT, Instagram Threads cross 100 million downloaded score

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.