शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेटशिवाय 'या' अ‍ॅप्सच्या मदतीने बिनधास्त शेअर करा डेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 10:58 IST

इंटरनेटशिवाय देखील आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत अथवा नातेवाईकांसोबत डेटा शेअर करू शकतो.

नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मेसेज, फोटो, व्हिडीओ. डॉक्युमेंट्स पाठवण्यासाठी युजर्स फोनचा वापर करतात. मात्र अनेकदा जास्त एमबीची फाईल शेअर केली तर मोबाईल डेटा लवकर संपतो. मात्र इंटरनेटशिवाय देखील आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत अथवा नातेवाईकांसोबत डेटा शेअर करू शकतो. यासाठी काही अ‍ॅप्सची मदत घ्यावी लागते. अशाच काही अ‍ॅप्सविषयी जाणून घेऊया. 

शेअरइट

शेअरइट हे अत्यंत लोकप्रिय अ‍ॅप असून अनेक जण त्याचा वापर करतात. जगभरात 200 पेक्षा जास्त देशांमध्ये 500 मिलियनहून जास्त लोक या अ‍ॅपचा वापर करतात. यूएसबीचा वापर न करता, डेटा न खर्च करता या अ‍ॅपच्या मदतीने  व्हिडीओ, गाणी, फोटो ट्रान्सफर करता येतात. हे अ‍ॅप अँड्रॉईड, आयओएस (आयफोन/आयपॅड), विंडोज फोन, विंडोज आणि मॅकला सपोर्ट करतं. तसेच याचा वापर करणं देखील खूप सोपं आहे. 

झाप्या 

जगभरात 45 कोटींपेक्षा जास्त लोक झाप्या अ‍ॅपचा वापर करतात. या अ‍ॅपच्या मदतीने अँड्रॉईड, आयफोन, आयपॅड, विंडोज, टायज़ेन, पीसी आणि मॅक सिस्टमवर इंस्टंट शेअरिंग करता येतं. तसेच डेटा खर्च न करता वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्सचा आनंदही घेता येतो. या अ‍ॅपच्या मदतीने फोटो, व्हिडीओ, अ‍ॅप शेअर करता येतात.

जेंडर

फाईल शेअरिंगसाठी जेंडर उत्तम अ‍ॅप आहे. शेअरइटप्रमाणेच हे अ‍ॅप देखील काम करतं. अ‍ॅपसाठी यूएसबी कनेक्शन किंवा पीसी सॉफ्टवेअरच गरज नाही. डेटाचा बॅकअप घेऊन हे अ‍ॅप एका फाईल मॅनेजरप्रमाणे काम करतं. हे अ‍ॅप इंग्लिश, बंगाली, चीनी, हिंदी, फ्रेंच, थाय भाषेसारख्या अन्य भाषांमध्येही सपोर्ट करतं. 

4 शेयर अ‍ॅप्स

4 शेयर अ‍ॅप्स हे केवळ अँड्रॉईड डिव्हाईससाठी सपोर्ट करतं. या अ‍ॅपच्या मदतीने व्हिडीओ, फोटो, गाणी, अ‍ॅप आणि फाईल्स शेअर करता येतात. अँड्रॉईडवर या अ‍ॅपला 4.3 रेटिंग मिळालं आहे. तसेच 4 शेयर अ‍ॅप्स इंग्रजी, स्पॅनिश, थाय, इटॅलियन सारख्या 31 भाषांमध्ये सपोर्ट करतं.   

सुपरबीम

सुपरबीम हे देखीव एक लोकप्रिय अ‍ॅप आहे. मोठ्या फाईल्स शेअर करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. अनेक जण या अ‍ॅपचा वापर करतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून रिसीव्ह केलेल्या सर्व फाईल्स या '/sdcard/SuperBeam' मध्ये डिफॉल्ट स्टोर होत आहे. सेटिंगमध्ये जाऊन ते नंतर बदलता येईल. 

 

टॅग्स :MobileमोबाइलInternetइंटरनेट