काही मिनिटांत स्वच्छ होईल घरातील प्रत्येक कोपरा; Samsung नं सादर केला ‘कॉर्डलेस व्हॅक्युम क्‍लीनर’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 07:53 PM2022-05-05T19:53:43+5:302022-05-05T19:53:51+5:30

Samsung Jet नावाची नवीन व्हॅक्युम क्लिनर्सची सीरिज कंपनीनं तीन मॉडेल्ससह सादर केली आहे.  

Samsung Jet Cordless Vacuum Cleaner Launched In India   | काही मिनिटांत स्वच्छ होईल घरातील प्रत्येक कोपरा; Samsung नं सादर केला ‘कॉर्डलेस व्हॅक्युम क्‍लीनर’ 

काही मिनिटांत स्वच्छ होईल घरातील प्रत्येक कोपरा; Samsung नं सादर केला ‘कॉर्डलेस व्हॅक्युम क्‍लीनर’ 

googlenewsNext

Samsung नं भारतात Samsung Jet कॉर्डलेस स्टिक व्हॅक्युम क्‍लीनर सीरिज लॉन्‍च केली आहे. यात सर्वात पावरफुल 200W पर्यंतच्या सक्शन पावरचा वापर करण्यात आला आहे. हे व्हॅक्युम क्लिनर्स घरातील 99.999% धूलिकण आणि एलर्जीला कारणीभूत असणारे कण स्वच्छ करतात, असा दावा कंपनीनं केला आहे. यात बॅटरी देण्यात आली आहे त्यामुळे हे कॉर्डलेस आहेत. एक बॅटरी वापरात असताना दुसरी चार्ज करून ठेवता येते त्यामुळे साफ सफाई मधेच थांबत नाही.  

स्पेसिफिकेशन आणि फीचर्स  

Samsung Jet मध्ये हवा शोषून घेण्यासाठी 27 छिद्र आहेत यातील 9 छिद्रांमध्ये एक सायक्लॉन सिस्टम देण्यात आली आहे. जी व्हॅक्युम क्लीनरच्या रेंजमधील छोटे कण सहज पकडते. सॅमसंग जेटमधील हाय कॅपसिटी बॅटरी एक तासभर सफाई करण्यास मदत करते. विशेष म्हणजे ही बॅटरी दुसऱ्या बॅटरीशी स्वॅप करून सतत 2 तास घर स्वच्छ करता येईल.  

Samsung Jet मधील विविध ब्रश वेगवेगळ्या फ्लोअर्स आरामात साफ करू शकतात. यातील सॉफ्ट अ‍ॅक्शन ब्रश हार्ड फर्शवर वापरता येतात. तसेच टर्बो अ‍ॅक्शन ब्रश एका मिनिटात 3,750 वेळा स्पिन होऊन कार्पेट साफ करू शकतो. हा 180 डिग्री फिरतो त्यामुळे चांगली स्वच्छता मिळते. या व्हॅक्युम क्लिनर्समधील डस्टबिन वॉशेबल आहे. जो एका क्लिकमध्ये वेगळा करून साफ करता येतो.  

Samsung Jet मधील डिजिटल डिस्प्ले मशीनची बॅटरी लेव्हल आणि ब्रशचा वापर इत्यादी माहिती दाखवतो. तसेच एरर आल्यास अलर्ट करतो. Samsung Jet 90 सह कस्‍टमर्सना एक स्टॅन्डिंग चार्जर ‘Z स्टेशन' मिळतो. जो व्हॅक्युम क्लीनर उभा करण्याच्या आणि चार्ज करण्याच्या कामी येतो. यात दोन बॅटरीज एकसाथ चार्ज करता येतात. ज्या 3.5 तासांत चार्ज होतात. Samsung Jet 90 चा वजन 1.89 किलोग्राम आहे.  

Samsung Jet कॉर्डलेस स्टिक व्हॅक्युम क्‍लीनरची किंमत  

कंपनीनं Jet 70, Jet 75 आणि Jet 90 असे तीन मॉडेल्स सादर केले आहेत. यांची किंमत 36,990 ते 52,990 रुपयांच्या दरम्यन असेल. हे व्हॅक्युम क्लिनर्स सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाइन वेबसाईटसह फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येतील. यांच्यावर एक वर्षाची वॉरंटी मिळेल.   

Web Title: Samsung Jet Cordless Vacuum Cleaner Launched In India  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :samsungसॅमसंग