OpenAI ने आपल्या चॅटबॉट ChatGPT चा विस्तार केला आहे. आतापर्यंत, चॅटबॉट वापरण्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागायचं किंवा वेब व्हर्जनचा वापर करावा लागायचा. आता तुम्ही हा चॅटबॉट WhatsApp वर किंवा कॉलवर एक्सेस करू शकता.
यासाठी तुम्हाला फक्त एक नंबर डायल करावा लागेल किंवा त्या नंबरवर WhatsApp करावं लागेल आणि तुमचं काम होईल. कंपनीने म्हटलं आहे की, अमेरिकेतील युजर्सना कॉलवर चॅटजीपीटीचा फ्री एक्सेस मिळेल, परंतु हा एक्सेस केवळ १५ मिनिटांसाठी असेल.
WhatsApp वर ChatGPT कोणाला मिळणार?
WhatsApp वर चॅटजीपीटीची सेवा ज्या ठिकाणी आधीच उपलब्ध असलेल्या ठिकाणी ही सेवा उपलब्ध आहे. कंपनीने सांगितलं की, हे सुरू करण्यासाठी, अमेरिकेतील युजर्सना व्हॉईस कॉलवर दर महिन्याला चॅटजीपीटीमध्ये १५ मिनिटांचा एक्सेस मिळेल. ChatGPT सह हे संभाषण एक एक्सपेरिमेंटल पद्धत आहे, त्यामुळे उपलब्धता आणि लिमिट बदलू शकतात.
कंपनीला या नवीन मार्गाने ChatGPT लोकांना सोप्या पद्धतीने उपलब्ध करून द्यायचं आहे. विशेषतः त्या लोकांसाठी जे अद्याप AI ला समोरासमोर आलेले नाहीत. द व्हर्जच्या रिपोर्टनुसार, OpenAI चे चीफ प्रोडक्ट ऑफिसर केविन वेल यांनी सांगितलं की, हे फीचर काही आठवड्यात विकसित करण्यात आलं आहे.
OpenAI चे रिअल-टाइम API फोन लाइनवर चॅटजीपीटी एक्सेस करण्यासाठी वापरले गेले आहे. तर GPT 4o Mini WhatsApp वर उपलब्ध आहे, जो API द्वारे जोडला गेला आहे. कंपनीने स्पष्ट केलं आहे की, ज्यांना एडवान्स फीचर, जास्त यूज लिमिट आणि पर्सनलाईज एक्सपीरियन्स हवा आहे त्यांनी ट्रेडिशनल ChatGPT अकाऊंट वापरावं.
WhatsApp वर ChatGPT कसा करायचा वापर?
अमेरिकेमधील युजर्स १-८००-ChatGPT वर कॉल करून या चॅटबॉटमध्ये प्रवेश करू शकतात. म्हणजे तुम्हाला १-८००-२४२-८४७८ वर कॉल करावा लागेल. तुम्ही या चॅटबॉटमध्ये लँडलाइनद्वारेही एक्सेस करू शकता. व्हॉट्सॲपवर एक्सेस करण्यासाठी तुम्हाला १-८००-२४२-८४७८ वर मेसेज करावा लागेल. या नंबरवर मेसेज करून तुम्ही ChatGPT मध्ये एक्सेस करू शकाल.