शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:44 IST

OnePlus Ace 6T Price and Specifications: वनप्लस एस ६टी मध्ये प्रचंड मोठी बॅटरी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना दीर्घकाळ फोन वापरता येणार आहे.

स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने त्याचा नवा स्मार्टफोन वनप्लस एस ६टी बाजारात लॉन्च करून प्रतिस्पर्धी कंपन्यांचे टेन्शन वाढवले आहे. या फोनची खासियत म्हणजे यात ८३०० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी दिर्घकाळ टिकेल. सध्या हा फोन चीनी बाजारात लॉन्च करण्यात आला असून लवकरच भारतात लॉन्च केला जाणार आहे. भारतात हा फोन वनप्लस १५ आर च्या नावाने लॉन्च केला जाईल.

बाजारात सध्या अनेक स्मार्टफोन ७५०० mAh क्षमतेच्या बॅटरीसह उपलब्ध आहेत. मात्र, या सर्वांमध्ये वनप्लस एस ६ टी हा स्मार्टफोन आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने ८३०० mAh क्षमतेची प्रचंड मोठी बॅटरी दिली आहे. या अतिरिक्त क्षमतेमुळे वापरकर्त्यांना आपला फोन वारंवार चार्जिंगला लावण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळाली आहे आणि त्यांना दीर्घकाळ फोन वापरता येणार आहे.

वनप्लस एस ६ टी: स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये ग्राहकांना ६.८३ इंचाचा डिस्प्ले मिळतो, जो 165Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच स्क्रीन प्रोटेक्शनसाठी ओप्पो क्रिस्टल शील्ड ग्लास देण्यात आला आहे. यात ५० मेगापिक्सेलचा मुख्य लेन्स आणि ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ग्राहकांना १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या फोनमध्ये  ८३०० mAh क्षमतेची प्रचंड मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी १०० वॅट सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

वनप्लस एस ६ टी: किंमत

चीन बाजारात या फोनची (१२जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज) किंमत  ₹२,५९९ युआन म्हणजेच ३३,१५० रुपयांपासून सुरू होते. तर, १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज असलेला फोन ३ हजार ८९९ युआनमध्ये (जवळपास ४८ हजार) लॉन्च करण्यात आला. हा स्मार्टफोन १७ डिसेंबर रोजी भारतात वनप्लस १५ आर या नावाने लॉन्च होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : OnePlus Ace 6T: Massive Battery, Long-Lasting Phone Launched!

Web Summary : OnePlus Ace 6T launched in China boasts an 8300mAh battery. Features include a 6.83-inch 165Hz display, 50MP camera, and 100W charging. Expected to launch in India as OnePlus 15R. Price starts from ₹33,150.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानOneplus 6Tवनप्लस 6T