India China Faceoff Doklam controversy hits Xiaomi; Samsung becomes India's No. 1 | डोकलाम वादाचा Xiaomi ला झटका; Samsung बनली भारताची नंबर १

डोकलाम वादाचा Xiaomi ला झटका; Samsung बनली भारताची नंबर १

दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी Samsung गेल्या दोन वर्षांपसून भारताच्या स्मार्टफोन बाजारात मागे पडली होती. मात्र, भारत-चीन सीमावाद आणि डोकलाममध्ये भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यामुळे शाओमीला (Xiaomi) मोठा झटका बसला आहे. चिनी मालावर बहिष्कार टाकल्यामुळे सॅमसंग पुन्हा नंबर एक बनली आहे. 


मार्केट रिसर्च फ़र्म काऊंटर पॉईंटच्या आकड्यांनुसार 2020 च्या तिसऱ्या तिमाहीला सॅमसंगकडे भारतीय बाजारातील 24 टक्के विक्री आली आहे. तर शाओमीच्या उत्पादनांची बाजारातील विक्री 23 टक्के राहिली आहे. गेल्या वर्षी 2019 च्या तुलनेत Xiaomi ची बाजारातील सत्ता 1 टक्क्याने कमी झाली आहे. भारत चीन तणावामुळे हे झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


शाओमीने गेल्या दोन वर्षांपासून सॅमसंगला डोके वर काढू दिले नव्हते. दोन्ही वर्षे शाओमीच भारतात नंबर १ ला होती. काऊंटर पॉईंटनुसार 2018 च्या तिसऱ्या तिमाहीनंतर पहिल्यांदाच शाओमी दोन नंबरला आली आहे. मात्र, ही परिस्थिती दूरगामी असण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. यामुळे शाओमी पुन्हा पुढील तिमाहीत नंबर १ ला जाण्याची शक्यता आहे. 


कारण गेल्या दोन महिन्यांत शाओमीने तुफानी संख्येने स्मार्टफोन विकले आहेत. फेस्टिव्ह सीझनमध्येही कंपनीला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तसेच दोन्ही कंपन्यांमधील फरकही मोठा नाहीय. 
 

बहिष्काराचा धसका! Xiaomi ने दालनांवरील लोगो झाकले; 'Made in India' लिहिले

भारतात कमी काळात सर्वात मोठी कंपनी बनलेलेली चीनच्या Xiaomi ने बहिष्काराच्या मोहिमेचा मोठा धसकाच घेतला आहे. इतर कंपन्यांपेक्षा शाओमीच जास्त भारतीय कंपनी असल्याचा दावा कंपनीचे भारतातील सीईओ करू लागले आहेत. मात्र, तरीही भीती कमी होत नसल्याने अखेर देशभरातील स्टोअर्सवरील शाओमीचे लोगो झाकण्याचा निर्णय घेतला होता. चीनने भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये 20 जवान शहीद झाले. चीनच्या या विश्वासघातामुळे सीमेवर युद्धजन्य परिस्थती असून चीन विविध भागांमध्ये कुरापती काढू लागला आहे. एकीकडे शांतता चर्चा सुरु ठेवायची आणि दुसरीकडे सैन्य फौजफाटा वाढवायचा अशी चीनची चाल आहे. यामुळे भारतीयांमध्ये कमालीचा आक्रोश दिसून येत आहे. 

Xiaomi ला सरकारचा जोरदार दणका; मोबाईलमधील ब्राऊझर बॅन केला

शाओमी त्यांच्या स्मार्टफोनमध्ये देत असलेला इनबिल्ट ब्राऊझर बॅन करण्यात आला आहे. 'Mi Browser Pro - Video Download, Free Fast & Secure' विरोधात ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. हा ब्राऊझर मोबाईलच्या परफॉर्मन्सवर वाईट पद्धतीने परिणाम करत असल्याचे समोर आले आहे. यावर कंपनीने सरकारसोबत बोलणी सुरु केली आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा ब्राऊझर मोबाईलवर परिणाम करत नसल्याचा दावा केला असून युजर अन्य कंपन्यांचे ब्राऊझर डाऊनलोड करू शकतात असेही म्हटले आहे.  सरकारने आणखी एक चिनी अॅप QQ International ब्लॉक केले आहे. शाओमीविरोधातील कारवाईमुळे युजरना फटका बसणार नाहीय. युजर त्यांच्या स्मार्टफोनद्वारे इंटरनेट वापरू शकणार आहेत. शाओमीने भारतात 10 कोटी स्मार्टफोन विकले आहेत. शाओमी ही भारतातील सर्वाधिक खपाची कंपनी बनलेली आहे. 

Web Title: India China Faceoff Doklam controversy hits Xiaomi; Samsung becomes India's No. 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.