माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 05:36 IST2026-05-18T05:36:23+5:302026-05-18T05:36:32+5:30

 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स' नावाच्या या नव्या तंत्रज्ञानाने टेक जगतात खळबळ उडवून दिली असून, या स्टार्टअपने बाजारात येताच तब्बल ६,२३८ कोटी रुपयांचा प्रचंड निधी गोळा केला आहे. 

Humans' holiday! AI will give birth to itself; 'Recursive Superintelligence' gets huge funding | माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी

माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी

सॅन फ्रान्सिस्को : आतापर्यंत मानवी संशोधक व इंजिनिअर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल्स विकसित आणि प्रगत करत आले आहेत. मात्र, एका अमेरिकन स्टार्टअपचा दावा मानल्यास, भविष्यात एआय स्वतःच स्वतःची रचना करेल, स्वतःमधील त्रुटी शोधेल आणि स्वतःलाच अपग्रेड करेल. 

 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स' नावाच्या या नव्या तंत्रज्ञानाने टेक जगतात खळबळ उडवून दिली असून, या स्टार्टअपने बाजारात येताच तब्बल ६,२३८ कोटी रुपयांचा प्रचंड निधी गोळा केला आहे. या मोहिमेत एआय संशोधक रिचर्ड सोचर यांच्यासोबत पीटर नॉर्व्हिंग व टिम रॉकटॅशेल सारखे दिग्गज तंत्रज्ञ सामील आहेत. तज्ञांच्या मते, नव्या विकासामुळे 'एआय निर्माता' व 'एआय प्रॉडक्ट' मधील फरक पूर्णपणे संपुष्टात येईल.

काय आहे 'रिकर्सिव्ह सेल्फ-इम्प्रूव्हमेंट'?
या तंत्रज्ञानामध्ये दोन एआय सिस्टीम एकमेकांच्या सोबतीने विकसित होतात. त्या सातत्याने एकमेकांमधील उणिवा आणि कमकुवत दुवे शोधून काढतात.
मानवी हस्तक्षेपाशिवाय एआय स्वतःच्या मर्यादा ओळखून स्वतःला अपग्रेड करतो. तसेच, नवीन सुधारणांची चाचणी आणि पडताळणी देखील स्वतःच करतो. 

प्रश्नांचे स्वरूप बदलणार
संशोधक रिचर्ड सोचर यांच्या मते, एकदा का वास्तविक 'रिकर्सिव्ह सेल्फ-इम्प्रूव्हमेंट' साध्य झाले, की त्यानंतर 'कोड कसा लिहायचा?' हा प्रश्नच उरणार नाही. त्याऐवजी, या असीमित बुद्धिमत्तेचा वापर सर्वात आधी कुठे करायचा? कोणत्या आजारावर आधी उपचार शोधायचे? किंवा कोणत्या जागतिक संकटाला प्राधान्य द्यायचे? हे व्यापक प्रश्न मानवासमोर असतील. याने मानवी कौशल्यांच्या गरजेवर मोठी कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

Web Title : एआई खुद को बनाएगा: रिकर्सिव सुपरइंटेलिजेंस को भारी फंडिंग

Web Summary : एक अमेरिकी स्टार्टअप का दावा है कि एआई 'रिकर्सिव सेल्फ-इम्प्रूवमेंट' का उपयोग करके खुद को डिजाइन और अपग्रेड करेगा। इस तकनीक ने भारी फंडिंग हासिल की है। विशेषज्ञों का मानना है कि यह एआई निर्माता और उत्पाद के बीच की रेखाओं को धुंधला कर देगा, जिससे मानवीय कौशल प्रभावित होंगे।

Web Title : AI to Create Itself: Recursive Superintelligence Gets Huge Funding

Web Summary : An American startup claims AI will design and upgrade itself using 'recursive self-improvement'. This technology has secured massive funding. Experts believe it will blur lines between AI creator and product, impacting human skills.