शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

फोनवर येणाऱ्या नोटिफिकेशनपासून अशी करा सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 4:48 PM

गुगल प्ले स्टोरवरून युजर्स अनेक अ‍ॅप इन्स्टॉल करत असतात. मात्र यामध्ये येणारे नोटिफिकेशन्स हे अनेकदा त्रासदायक ठरतात.

ठळक मुद्देगुगल प्ले स्टोरवरून युजर्स अनेक अ‍ॅप इन्स्टॉल करत असतात. येणारे नोटिफिकेशन्स हे अनेकदा त्रासदायक ठरतात. नोटिफिकेशन चॅनलवर व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशन शिवाय नोटिफिकेशन टोन आणि कस्टम टाईम बदलता येतं. नोटिफिकेशन फीचर अँड्रॉईड 8 ओरीयो आणि यानंतर येणाऱ्या ओएसमध्ये आहे.

नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. कॉलिंग, टेक्सिंग यासोबतच नोट्स सेव्ह करण्यासारखी अनेक कामं युजर्स करत असतात. गुगल प्ले स्टोरवरून युजर्स अनेक अ‍ॅप इन्स्टॉल करत असतात. मात्र यामध्ये येणारे नोटिफिकेशन्स हे अनेकदा त्रासदायक ठरतात. अनेकांना नोटिफिकेशन मॅनेज करता येतं हे माहीत नाही. नोटिफिकेशन चॅनलवर व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशन शिवाय नोटिफिकेशन टोन आणि कस्टम टाईम बदलता येतं. 

सेटिंग्समध्ये हा पर्याय मिळेल 

नोटिफिकेशन फीचर अँड्रॉईड 8 ओरीयो आणि यानंतर येणाऱ्या ओएसमध्ये आहे. युजर्स सर्व अ‍ॅप्ससाठी एकाच जागी नोटिफिकेशन मॅनेज करता येतात. यासाठी सर्वप्रथम अँड्रॉईड स्मार्टफोन अ‍ॅप ड्रॉर ओपन करा आणि अ‍ॅप सेटिंग्समध्ये जा. तिथे नोटिफिकेशनचा एक पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून नोटिफिकेशन चॅनल्स क्रिएट अथवा मॅनेज करता येतं. 

नोटिफिकेशन सेटिंग्समध्ये फेलियर नोटिफिकेशन, मेसेज नोटिफिकेशन, क्रिटिकल अ‍ॅप अलर्ट्स, मीडिया प्लेबॅक, ग्रुप नोटिफिकेशन आणि अदर्स सारखे पर्याय दिसतील. युजर्सना जे नोटिफिकेशन एडिट करायचं आहे त्यावर टॅप करा. त्यानंतर गरजेनुसार त्यामध्ये युजर्स बदल करू शकतात. हाइड अ‍ॅप बारमधून देखील असं करता येतं. वेगवेगळ्या ऑडिओ टोन्स सेट करण्यासाठी साऊंडवर टॅप करा. याच पॅनच्या मदतीने लॉक स्क्रीन नोटिफिकेशन इनेबल करता येतं. 

फोन खूप स्लो चार्ज होतो? 'ही' आहेत कारणं

फोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळेच बॅटरी लवकर लो होते. फोन चार्ज करण्यासाठी चार्जरचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. मात्र कधी कधी फोन स्लो चार्ज होतो. त्यामागे अनेक कारण असतात. ही कारणं जाणून घेऊया.

चार्जर बदला - चार्जर खराब असल्यामुळे फोन अनेकदा चार्ज होत नाही. अशा वेळी फोनसोबत येणारी केबल आणि अ‍ॅडप्टरच्या मदतीने फोन चार्ज करण्याचा सल्ला दिला जातो. ओरिजनल चार्जरची खरेदी करा.

वीक पॉवर सोर्स - स्लो चार्जिंगसाठी नेहमी चार्जर जबाबदार असतो असं नाही. अनेकदा पॉवर सोर्स वीक असल्याने फोन स्लो चार्ज होतो.खराब बॅटरी - फोनची बॅटरी खराब झाल्यामुळे काही वेळा फोन स्लो चार्ज होतो.

डॅमेज यूएसबी पोर्ट - यूएसबी पोर्ट डॅमेज झालं असल्यास फोन स्लो चार्ज होतो. अशावेळी ते बदला.

बॅकग्राऊंड अ‍ॅप - फोन स्लो चार्ज होण्यासाठी काही वेळा बॅकग्राऊंड अ‍ॅप देखील जबाबदार असतात. फोनमध्ये एखादं नवीन अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर फोन स्लो झाला असेल तर ते अ‍ॅप लगेच अनइन्स्टॉल करा.

 

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान