शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

Facebookला टक्कर देण्यासाठी Google आणणार 'Shoelace'?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 10:28 AM

 'Shoelace' च्या माध्यमातून गुगल पुन्हा एकदा सोशल नेटवर्किंग स्पेसमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

नवी दिल्ली : गुगल आपल्या युजर्ससाठी नेहमीच नव-नवीन अपडेट घेऊन येत असते. यावेळी गुगलने 'Shoelace' अॅप आणण्याच्या तयारीत आहे. 'Shoelace' गुगलचा सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गुगलने आपले जुने सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म Google+ बंद केले. त्यामुळे गूगल आपल्या युजर्संना नवीन 'Shoelace' सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आणण्याची शक्यता आहे. फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच्या तुलनेत Google+ ला म्हणाला तितका प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गुगलने Google+  बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 

सोशल नेटवर्किंगमध्ये स्पेस बनवण्याची तयारी 'Shoelace' च्या माध्यमातून गुगल पुन्हा एकदा सोशल नेटवर्किंग स्पेसमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याआधी Google+ याशिवाय गुगलच्या फ्रेन्ड कनेक्ट आणि गुगल बज सुद्धा युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. एप्रिलमध्ये Google+  बंद केल्यानंतर पुन्हा  'Shoelace' च्या माध्यमातून गुगल सोशल नेटवर्किंगमध्ये दमदार एन्ट्री करण्याच्या प्रयत्नात आहे.   'Shoelace' च्या नावानुसार असे समजते की, गुगलचे हे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लोकांना एकत्र आणण्याचे काम करेल. 

युजर्सच्या लाईफमध्ये भरणार रोमांचगुगल आपल्या 'Shoelace'  या सर्व्हिसमधून युजर्सच्या सोशल लाईफला सुपरचार्ज करु पाहत आहे. यासाठी 'Shoelace'  च्या माध्यमातून एकसारख्या विचारधारेच्या व्यक्तींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल. यासाठी 'Shoelace' युजर्सच्या पसंतीला नक्कीच उतरेल अशी आशा आहे. 

अॅक्टिव्हिटी आणि इव्हेंटअॅपमध्ये दिलेल्या  'Loop' मधून युजर्स इव्हेंट आणि अॅक्टिव्हिटीचा प्लॅन करु शकतात. तसेच, यामध्ये भाग घेऊ शकतात. त्यामुळे 'Shoelace' ला हायपरलोकल अॅप सुद्धा म्हटले जाऊ शकते, जसे की फेसबुक इव्हेंट सारखे. गुगलचे हे फीचर अशा लोकांच्या कामी येईल की, जे नवीन शहरात आले आहेत आणि त्या शहराबद्दल माहिती जाणून घेणार आहेत.

टेस्टनंतर होणार लॉन्चये प्रॉडक्ट गुगलच्या वर्कशॉप Area 120 द्वारे तयार करण्यात आले आहे. ज्याचा मुख्य उद्देश रियल-वर्ल्ड कनेक्शन आहे. दुसऱ्या सोशल नेटवर्क्सच्या तुलनेत गुगल याला लहान स्तरावर लॉन्च करणार आहे. सध्या गुगल ला न्यूयॉर्कमध्ये टेस्ट केले जाणार आहे. यशस्वी टेस्टिंगनंतर याला अन्य शहरात लॉन्च करण्यात येईल. 'Shoelace'  अॅप अॅन्ड्राईड आणि आयओएसवर सिस्टिमवर चालणार आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानgoogleगुगलSocial Mediaसोशल मीडियाSocialसामाजिकMobileमोबाइल