गुगलने अँड्रॉइड फोनवर त्यांच्या Gemini AI च्या काम करण्याच्या पद्धतीत काही मोठे बदल जाहीर केले आहेत. एका ईमेलद्वारे युजर्सना सांगण्यात आलं की, आता जेमिनी एआय WhatsApp सारख्या थर्ड-पार्टी एप्समधील डेटा एक्सेस करू शकते, जेणेकरून तुम्ही व्हॉइस कमांडद्वारे त्या एप्सच्या सुविधा वापरू शकता. हे एक उपयोगी फीचर वाटतं परंतु खरी चिंता अशी आहे की, गुगलने हुशारीने ईमेलमध्ये हे तथ्य लपवले आहे की, तुम्ही Gemini Apps Activity बंद केली असली तरीही ही डेटा शेअरिंग सुरू राहील.
गुगल स्टोर करतो डेटा
गुगलच्या वेबसाइटनुसार, " Gemini Apps Activity चालू असो वा बंद, तुमचे चॅट्स तुमच्या खात्यात ७२ तासांपर्यंत सेव्ह केले जाऊ शकतात." याचा स्पष्ट अर्थ असा आहे की WhatsApp वरील तुमचे खासगी संभाषण देखील तात्पुरतं जेमिनीजवळ स्टोर केलं जाऊ शकतं. गुगलचा दावा आहे की असं केल्याने, जेमिनी तुमच्यासाठी उत्तरं तयार करू शकेल आणि ती पाठवू शकेल. मात्र यामुळे युजर्सच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होतात.
मेटाचा नियम
मेटाने नेहमीच म्हटलं आहे की, WhatsApp चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतात आणि इतर कोणीही वाचू शकत नाहीत, अगदी मेटाला नाही. परंतु ही सुरक्षा फक्त एपमध्ये मर्यादित आहे. तुमच्या फोनवर येणारे नोटिफिकेशन अलर्ट ज्यामध्ये मेसेजचा मजकूर असतो ते वाचता येतं. काही अँड्रॉइड फोन WhatsApp न उघडता २४ तासांसाठी या नोटिफिकेशन्स सेव्ह करतात.
गुगलने अद्याप स्पष्ट केलेलं नाही की जेमिनी या चॅट्स कसे वाचतील किंवा स्टोअर करतील, परंतु नोटिफिकेशन्स एक्सेस करण्याचा सर्वात सोपा आणि संभाव्य मार्ग एपद्वारे असू शकतो. अँड्रॉइड सिस्टममध्ये जेमिनीच्या खोल प्रवेशामुळे, ते केवळ नोटिफिकेशन्सपुरते मर्यादित राहणार नाही आणि यामुळे युजर्सच्या मेसेजिंग अनुभवाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण होते.
'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
- तुमच्या अँड्रॉइड फोनवर जेमिनी App उघडा.
- वर उजवीकडे असलेल्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा.
- Gemini Apps Activity पर्यायावर क्लिक करा.
- आता उघडणाऱ्या स्क्रीनमध्ये तुम्हाला एक टॉगल स्विच दिसेल, तो बंद करा.
यानंतर जेमिनी तुमच्या कोणत्याही एप्समधील डेटा अॅक्सेस करू शकणार नाही. लक्षात ठेवा की जर कोणताही डेटा आधीच जेमिनीकडे असेल तर तो त्याच्या सर्व्हरवर ७२ तासांसाठी सेव्ह केला जाऊ शकतो.